Home > News > नालेसफाईचे लाखो रुपये गेले कुठे?

नालेसफाईचे लाखो रुपये गेले कुठे?

नालेसफाईचे लाखो रुपये गेले कुठे?
X

गेली दोन दिवसापासून नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असून रस्त्यावरती पाणी साचत आहे व लोकांच्या घरांमध्ये देखील पाणी जात आहे. महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून नालेसफाई रस्त्यामध्ये पडलेले खड्डे बुजविण्या आले नाहीत.त्यामुळे रस्त्यावरचे पाणी लोकांच्या घरामध्ये जात आहे. महानगरपालिकेवरती काँग्रेसची एक हाती सत्ता असून विकासाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करून देखील विकास झाला नाही.तरी महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर नाले सफाई करून हा प्रश्न मार्गी लावावा ही सर्वसामान्य नागरिकांतून आता प्रतिक्रिया येत आहे व येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये याचे परिणाम दिसून येतील असे देखील सर्वसामान्य नागरिकांना वाटते.


मनोज जाधव, सामाजिक कार्यकर्ते

Updated : 9 July 2022 2:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top