Home > News > "मी जेव्हा शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल तेव्हा..." दिल्ली हिंसाचारावर कंगनाचं ट्वीट

"मी जेव्हा शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल तेव्हा..." दिल्ली हिंसाचारावर कंगनाचं ट्वीट

“झंड बनकर रह गए है, शर्म कर लो आज.. ज्या प्रत्येक भारतीयाने या हिंसाचाराला सपोर्ट केला आहे, ते सर्व दहशतवादी आहेत.” असं देखील कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मी जेव्हा शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल तेव्हा... दिल्ली हिंसाचारावर कंगनाचं ट्वीट
X

गेल्या दोन महिन्यांपासून शांततेत आंदोलन कऱणाऱ्या शेतकऱ्यांच्या दिल्लीमधील ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. दिल्लीमधील मोर्चाचा ठरलेला मार्ग सोडून आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यावर धडक मारली. तिथे या आंदोलकांनी सुरक्षा भेदत किल्ल्याच्या दर्शनी भागावर शेतकरी संघटनेचा ध्वज फडकावला.

या सर्व प्रकारावर आता कंगना रणौतने टीका केली आहे. कंगनाने "मी जेव्हा शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल तेव्हा माझे सहा ब्रॅंडसोबतचे करार मोडले. त्यामुळेच या कंपन्यांनी मला ब्रॅण्ड एम्बेसेडर म्हणून कमी केले. पण आज मला सांगावस वाटत आहे की, ज्या प्रत्येक भारतीयाने या हिंसाचाराला सपोर्ट केला आहे, ते सर्व दहशतवादी आहेत. त्यामध्ये त्या देशविरोधी ब्रॅण्डचाही समावेश आहे" असे कंगना म्हणाली.

कंगनाने केलेल्या ट्विटमध्ये काही आंदोलक हे पोलिसांवर तलवार घेऊन हल्ला करण्यासाठी धावतानाचा व्हिडिओ कंगनाने शेअऱ केला आहे. काही ठिकाणी जमावाने पोलिसांवर ट्रॅक्टर अंगावर घालण्याचे व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.


Updated : 26 Jan 2021 10:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top