Home > News > जेव्हा भर कोर्टात दिलीप कुमार म्हणाले होते, 'मला मधुबाला आवडते'

जेव्हा भर कोर्टात दिलीप कुमार म्हणाले होते, 'मला मधुबाला आवडते'

जेव्हा भर कोर्टात दिलीप कुमार म्हणाले होते, मला मधुबाला आवडते
X

नवी दिल्ली: ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते ( Indian actor ) दिलीप कुमार ( Dilip Kumar ) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांना अनेकदा तपासणीसाठी रुग्णालयात आणले जात होते. दिलीप कुमार ( dilip kumar ) यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते त्यांना मिस करत असून, त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत आहे. दिलीप कुमारांची अशीच एक आठवण म्हणजे, मधुबाला ( Madhubala ) वर त्यांनी केलेल्या प्रेमाची कथा आजही तरुणांच्या चर्चेच विषय ठरतो.

मधुबाला आणि दिलीप कुमार यांची प्रेमकथा 1951 च्या 'ताराना' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि प्रेम झालं. मधुबालाने प्रेम व्यक्त करण्यासाठी दिलीप कुमार यांच्या मेक-अप रूममध्ये एक चिठ्ठीसोबत गुलाबाचा फुल पाठवला. ज्यात लिहलं होत, 'जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर हा गुलाब स्वीकारा.' दिलीप कुमारांनी गुलाबाचा फुल घेत मधुबाला च्या प्रेमाचं स्वीकार केला. पुढे हे प्रेमप्रकरण एवढ वाढलं की, दिलीप कुमार आपल्या चित्रपटाचे शूटिंग सोडून मधुबालाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन पोहोचत असे.

सगळं सुरळीत सुरु असताना मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांची या प्रेमप्रकरणात एंट्री झाली. खान यांनी आपल्या मुलीवर बारीक नजर ठेवली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे दिग्दर्शकही अस्वस्थ झाले. जेव्हा बी.आर. चोपडा मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यासमवेत 'नया दौर' चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा प्रकरण अधिकच चिघळलं, चोपडा यांना भोपाळजवळ दिलीप आणि मधुबाला याचं आउटडोर शूटिंग करायचं होतं. मात्र यासाठी खान यांनी परवानगी दिली नाही आणि विरोध केला.

त्यामुळे चोपडा यांनी, मधुबालाऐवजी वैजयंतीमाला यांची निवड केली आणि मधुबालाचा कट लावेलेला फोटो वृत्तपत्रात छापून आणला. त्याला उत्तर म्हणून खान यांनी सुद्धा मधुबालाच्या सर्व चित्रपटांची नावे लिहत 'नया दौर' चित्रपटाच्या नावासमोर कट मारून फोटो वृत्तपत्रात छापून आणला. पुढे हे प्रकरण एवढ वाढलं की थेट कोर्टात पोहचलं. जेव्हा दिलीपकुमार यांची सुनावणीदरम्यान साक्ष झाली तेव्हा, ते कोर्टात म्हणाले, 'होय, मला मधुबाला आवडते, माझं तिच्यावरच प्रेम असचं कायम राहील', ( Dilip Kumar said in court, 'I like Madhubala' ) पण त्यांच्या नात्यात पुढेही चढउतार चालूच राहिले. एक दिवस असा आला जेव्हा दोघांना नातेसंबंध टिकवणे कठीण झालं आणि ही प्रेमकथा संपुष्टात आली. नंतर पुढे दिलीप कुमार यांनी सायरा बानोला आपलं साथीदार म्हणून निवडले.

Updated : 7 July 2021 5:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top