Home > News > Whatsapp मधील हा बदल ,तुमचं आयुष्य बदलेल

Whatsapp मधील हा बदल ,तुमचं आयुष्य बदलेल

Whatsapp मधील हा बदल ,तुमचं आयुष्य बदलेल
X

Whatsapp वर अनेक नवीन फिचर येत असतात .आता सुद्धा व्हाट्सअप ने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. आता तुम्हाला विचार पडला असेल कि,हे व्हाट्सअप फीचर कोणते आहे ? याची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत लेख वाचा .

व्हाट्सअप नवीन फिचर हे AUDIO स्टेटस संदर्भात आहे. तुम्ही आता तुमच्या आवाजातील गाणी ,शायरी तसेच कोणताही संदेश आता व्हाटसऍपच्या स्टेटसला लावू शकता .ज्यापद्धतीने तुमचे फोटो किंवा व्हिडिओचे स्टेटस तुम्ही लावता अगदी त्याचप्रमाणे तुम्ही AUDIO स्टेटसला लावू शकता .

जसं इतरांचे स्टेटस दिसतात अगदी त्याचप्रमाणे आपल्याला व्हाट्सअपचे स्टेटस दिसतात . जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर व्हाट्सअप स्टेटस आपल्याला ग्रीन कलर मध्ये नेहमी दिसत असतात ,नुकतंच whatsapp ने सुद्धा असाच स्टेटस ठेवला होता .

काय होता हा STATUS ?

ज्यापद्धतीने तुम्ही फोटोज लावता किंवा व्हिडिओ स्टेटसला लावतात. त्याचप्रमाणे तुमचा आवाज आता तुम्ही तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहचवू शकता . कसा? स्टेटसला आपला आवाज लावण्यासाठी नेहमीचीच प्रक्रिया आहे . तुम्ही ज्या पद्धतीने फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करता ,त्याच पद्धतीने तुमचा ऑडिओ तुम्हाला स्टेटसला लावायचा आहे आणि यामध्ये जर तुम्हाला फक्त ठराविक व्यक्तींना तुमचा आवाज ऐकवायचा असेल ,तर तोही ऑप्शन प्रायव्हसी मध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता.

ही होती व्हाट्सअपच्या नवीन फीचर ची माहिती... तुम्हाला कशी वाटली ? नक्की प्रतिसादात कळवा...

Updated : 1 Jun 2023 6:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top