Home > News > या पॉर्न स्टारला करायचंय मोटरस्पोर्ट्समध्ये ‘कमबॅक’, पैशांसाठी बनली होती पॉर्न स्टार

या पॉर्न स्टारला करायचंय मोटरस्पोर्ट्समध्ये ‘कमबॅक’, पैशांसाठी बनली होती पॉर्न स्टार

या पॉर्न स्टारला करायचंय मोटरस्पोर्ट्समध्ये ‘कमबॅक’, पैशांसाठी बनली होती पॉर्न स्टार
X

ऑस्ट्रेलियातील V8 सुपरकार्स रेसिंगमधील पहिली फूल टाईम रेसर रिनी ग्रेसीला पुन्हा एकदा मोटरस्पोर्ट्समध्ये कमबॅक करयाचं आहे. रिनी आर्थिक चणचणीमुळे पॉर्न इंडस्ट्रीकडे वळली. रिनीने 2008 मध्ये फुल टाइम सुपरकार रेसर बनून करिअरला सुरुवात केली. २०१५ पर्यंत तिने चांगली कामगिरी देखील केली. पण २०१७ मध्ये रिनीची रेसिंगमधील कामगिरी खालावल्याने तिला स्पॉन्सर्स मिळणं बंद झालं. त्यानंतर कंपनीने तिच्या जागी दुसऱ्या रेसरची निवड केली. यातून आलेल्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी तिने पॉर्न इंडस्टीची वाट धरली.

‘न्यूज कॉर्प’ या प्रसिध्द वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत रिनी म्हणाली की, ‘घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने मी १४ वर्षांनंतर मोटरस्पोर्ट्स खेळण बंद करून अडल्ट इंडस्ट्रीत नशिब आजमावलं. त्या क्षेत्रात मला आठवड्याला २५,००० डॉलर्सप्रमाणे पैसे मिळतात. मी माझ्या आयुष्यात घेतलेला हा सर्वात चांगला निर्णय आहे. या निर्णयामुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. मी याचा कधी विचारही केला नव्हता. पण लोकं काय म्हणतात याचा मी विचारत करत नाही. मला चांगले पैसे मिळत आहेत आणि मी जे काही करते त्यात मी आनंदी आहे. पण आता पुन्हा मोटरस्पोर्ट्समध्ये कमबॅक करायचं आहे. पण त्यांना माझं पुनरागमन चालणार आहे का हा प्रश्न आहे. सध्या मला लोक काय म्हणतील असा विचार करून दडपण घेण्याची गरज नाही, कारण आता रेसिंगव्यतिरिक्तही माझ्याकडे पर्याय आहे. माझं मोटरस्पोर्ट्समधलं पुनरागमन हे माझ्या आनंदासाठी आणि मजेसाठी असेल. मी हल्ली रेसिंग पाहते आणि स्वत:ला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करते.” असं रिनीने म्हटलं आहे.

Updated : 24 July 2020 2:08 AM GMT
Next Story
Share it
Top