Home > News > रावेर हत्याकांड : "एवढीशी भावंड काय गुन्हा त्यांचा???" : पंकजा मुंडे

रावेर हत्याकांड : "एवढीशी भावंड काय गुन्हा त्यांचा???" : पंकजा मुंडे

रावेर हत्याकांड : एवढीशी भावंड काय गुन्हा त्यांचा??? : पंकजा मुंडे
X

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतातील घरामध्ये चार भावडांचा कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या केल्याची निघृन घटना घडली. या प्रकरणावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शोक व्यक्त करत गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची मागणी ट्वीट द्वारे केली आहे.

पंकजा मुंडे यांनी ""रावेर हत्याकांड" ..निव्वळ अमानवी अमानुष ... एवढीशी झोपडी, एवढीशी भावंड काय गुन्हा त्यांचा??? .. फास्ट ट्रॅक खटला दाखल करून त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे ..." अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.

दरम्यान, बोरखेडा येथे शुक्रवारी सकाळी चार भावंडांचे हत्याकांड उघडकीस आले होते. या भावंडांची कुऱ्हाडीने हत्या केली होती. या चारही मृत भावंडांवर शनिवारी दुपारी एकाचवेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (दफनविधी) करण्यात आले. याप्रसंगी मयत भिलाला कुटुंबासह आप्तेष्ठांना अश्रू अनावर झाले होते.


Updated : 19 Oct 2020 7:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top