Home > News > आज हवामान विभागाचा पावसाचा अंदाज काय?

आज हवामान विभागाचा पावसाचा अंदाज काय?

आज हवामान विभागाचा पावसाचा अंदाज काय?
X

मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने महाराष्ट्रात सध्या उसंत घेतली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने सर्वदूर महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबई, कोकण यासह उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला आहे. आता पुढील दोन दिवस राज्यामध्ये घाटमाथा आणि कोकणपट्ट्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाच्या सरी बरसणार आहेत. पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी असणार असल्याची माहिती सुद्धा हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या भागांना मोठा दिलासा आहे....

Updated : 31 July 2023 5:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top