Home > News > महिलांना अर्थसंकल्पातून काय मिळाले?

महिलांना अर्थसंकल्पातून काय मिळाले?

महिलांना अर्थसंकल्पातून काय मिळाले?
X

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज महाविकास आघाडी सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांविषयी अनेक खास तरतुदी करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी या अर्थसंकल्पात काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात महिलांविषयी काय तरतुदी करण्यात आल्या आहेत वाचा..

अर्थसंकल्पात महिलांसाठी केलेल्या तरतुदी..

• सन 2022 वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येत आहे. महिला शेतकऱ्यांना कृषी योजनांमध्ये राखीव असलेल्या निधीमध्ये तीस टक्के रक्कम वाढवून यापुढेही 50 टक्के करण्यात येणार आहे.

• सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशु रुग्णालयाची स्थापना करण्यात येणार आहे.

• हिंगोली , यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड या ठिकाणी प्रत्येकी शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय स्थापन करण्यात येतील.

• कौशल्यात वाढ करून रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब स्थापन करण्यात येईल त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

• गडचिरोली जिल्ह्यात खासगी सहभागातून कौशल्य वर्धन केंद्र उभारणी करून दरवर्षी पाच हजार विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल यासाठी शासनाकडून 30 कोटी रुपयांची तरतूद व उर्वरित निधी सामुदायिक सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे.

• महाविकास आघाडी सरकारने भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय

• त्यासाठी मुंबई विद्यापीठातील जागा निश्चित करून शंभर कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे.

• मुंबई येथील एलफिस्टन आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाकरीत प्रत्येकी पाच कोटी रुपयांची तरतूद..

• तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल व व्याज सवलतीची स्वयंरोजगार योजना राबविण्यात येणार आहेत.

• राज्यातील सर्व तृतीयपंथीयांना ओळखपत्रे आणि शिधापत्रिका देण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे

• एकात्मिक बाल विकास योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या करण्यासाठी e - शक्ती योजनेतून 1 लाख 30 हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक भगिनींना मोबाईल सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल.

• 0 ते 18 वयोगटातील बालकांचे पालन करणाऱ्या संस्थांना किंवा कुटुंबाला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या प्रति बालक अनुदानात 11 हजार 25 रुपायांवरून 2 हजार 500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.

• जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीपैकी तीन टक्के निधी महिला व बाल विकास योजनेसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

• त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारण्यात येणार आहे.

• नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी बालविकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

• सन 2022-23 वर्षासाठी महिला व बालकल्याण विभागासाठी 2 हजार 472 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.

• विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी वर्षानिमित्त 'मी रमाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना' जाहीर करण्यात आली आहे.

• कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत भांडवलाच्या कर्जावरील व्याजाचे शंभर टक्के परतफेड करण्यात येईल.

• सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल.

• राज्य संरक्षित वारसा स्थळ असलेल्या फुले दाम्पत्य निवास्थान फुले वाडा या स्मारकाच्या विस्तारासाठी शंभर कोटी रुपयांचा निधीची तरतूद

• महाराणी सईबाई यांच्या स्मृती परिसरासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

Updated : 11 March 2022 10:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top