Home > News > शरद पवारांनी आषाढी एकादशीला काय खाल्ले.. ?

शरद पवारांनी आषाढी एकादशीला काय खाल्ले.. ?

शरद पवारांनी आषाढी एकादशीला काय खाल्ले.. ?
X

आज राष्ट्रवीचे नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका पत्रकाराने त्यांना तुम्ही नास्तिक आहेत तर आज आषाढी एकादशीला उपवास केला आहे का? असा प्रश्न विचारला यावेळी त्यांनी दिलेले उत्तर एकदमच भन्नाट होते.

शरद पवार आज औरंगाबाद पत्रकारांशी बोलतं होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. आपण अनेक वेळा ऐकलं असेल कि शरद पवार नास्तिक आहेत. त्यांचा कोणत्याही कर्मकांडावर विश्वास नाही. याच उत्सुकतेतून एका पत्रकाराने तुम्ही आज उपवास केला आहे का? असा थेट प्रश्न पवारांना विचारला. या प्रश्नाचे उत्तर शरद पवारांनी दिले आणि त्या ठिकाणी एकच हशा पिकला. त्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले कि, एखाद्या दिवशी उपवास काय असतो ते पाहण्यासाठी आज सकाळी वड्याचा भात, भगर खाल्ली आहे असं मजेशीर उत्तर त्यानी दिले. यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः चार वेळा पंढरपूरला जाऊन पूजा केली असल्याचं सांगत ती राज्याची परंपरा असल्याचं त्यांनी सांगितलं. मी आस्तिक कि नास्तिक हे महत्वाचं नसल्याचं सुद्धा ते म्हणाले..


Updated : 11 July 2022 3:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top