Home > News > Earthquake: भूकंप होतो कसा? मानवनिर्मित कारणाने भूकंप होतो का?

Earthquake: भूकंप होतो कसा? मानवनिर्मित कारणाने भूकंप होतो का?

Earthquake: भूकंप होतो कसा? मानवनिर्मित कारणाने भूकंप होतो का?
X

आजपर्यंत तुम्ही छोट्या मोठ्या ऐकलं असेल किंवा अनुभव देखील घेतले असतील. कधीतरी अचानक घरातील सर्व वस्तू थरथर हलू लागतात आणि मग आपल्याला समजतं की भूकंप आला आहे. मग सर्वांची एकच धावपळ सुरू होते, कुणी घरातील टेबलच्या खाली तर कोण घराचा थेट दरवाजा पकडून बाहेर रस्त्यावरती जाऊन उभे राहतात. एखादा मोठा भूकंप (Earthquake) काय करू शकतो हे आपण किल्लारी परिसरात (KIllari Earthquake 1993) घडलेल्या घटनेवरून अनुभवू शकतो. या भूकंपात अनेकांची आयुष्य बरबाद झाली होती. भूकंप म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटे येतात. इतका भयंकर असलेला हा भूकंप नक्की होतो तरी कसा हे तुम्हाला माहित आहे का? भूकंप नक्की का होतात? जाणून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत वाचा.. ( What are the reasons of earthquake?)

तुम्ही मागच्या काळात टर्की आणि सीरिया (turkey and syria earthquake) या देशांमधील अनेक बातम्या वाचल्या असतील किंवा टीव्हीच्या माध्यमातून पाहिल्या असतील. या दोन देशांमध्ये मोठमोठे भूकंप झाले आणि त्यानंतर त्या ठिकाणी काय परिस्थिती झाली हे तुम्हाला सर्वांनाच ठाऊक असेल. जगभरात दरवर्षी कुठे ना कुठे अशा प्रकारच्या घटना घडल्याचं पाहायला मिळतं. भारतात देखील यापूर्वी अशा काही घटना घडल्या आहेत. जगभरात दरवर्षी २० हजार भूकंपाचे धक्के नोंद होतात. म्हणजेच दरवर्षी वीस हजार भुकंप जगभरात होतात का? तर नाही.., आता जे भूकंप मापन केंद्र आहे त्या ठिकाणी या सर्व नोंदी टिपल्या जातात. पण असं म्हटलं जातं की पृथ्वीवर दरवर्षी लाखो भूकंप होतात पण यामध्ये अनेक भूकंप हे सौम्य असतात ते रेकॉर्ड करणे शक्य नसतं..

भूकंप नक्की होतो कसा..? । How exactly does an earthquake happen?

भूकंप कसा होतो हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पृथ्वीच्या गर्भाशयातील रचना समजून घेणे गरजेचे आहे. आपल्याला वरती दिसणारे जे थर आहेत त्यानंतर पृथ्वीच्या आत मध्ये खडक, वाळू, दगड असे अनेक थर आहेत. भूगर्भशास्त्रानुसार (geology) पृथ्वी बारा टेक्टोनिक प्लेट्सवर (Tectonic Plate) वसलेली आहे. म्हणजे 12 वेगवेगळ्या खडकांचे थर पृथ्वीच्या गर्भाशयात आहेत. या प्लेट्स अतिशय संत गतीने फिरत असतात. कधी कधी प्लेट्स एकमेकांवर आढळतात आणि याच घर्षणामुळे तयार होणारी जी ऊर्जा असते ती ऊर्जा जमिनीच्या वर येते आणि त्यामुळेच भूकंपाचे धक्के बसतात.. थोडक्यात काय तर जमिनीच्या आत होणाऱ्या हालचालींमुळे जी काही कंपन तयार होतात ती कंपनं म्हणजेच भूकंप...

भूकंप मानवनिर्मित कारणांमुळे होऊ शकतो का?

अनेक वर्ष असं वाटत होतं की भूकंप हा नैसर्गिक कारणांमुळेच होतो. याला कुठलीही मानवनिर्मित कारणे कारणीभूत नाहीत. पण आता अलीकडे काही संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. माणूस विकासाच्या नावावर जी काही कारणामे पृथ्वीवर करत आहे त्याच्या मनुष्याला मोठा धोका निर्माण होणार आहे. माणसाच्या कृत्यामुळे भूकंप होत असल्याचं आता नव्याने समोर आलंय.. तर मानवनिर्मित कारण नक्की आहे तरी काय? थांबा हे देखील तुम्हाला सविस्तर सांगतो. तर तुम्हाला माहित असेल की, पृथ्वीच्या पोटातून तेल काढण्यासाठी अनेक किलोमीटर पर्यंत खोदकाम केलं जातं. आणि अशा प्रकारे तेल खोडण्यासाठीही दरवर्षी भारतात दहा हजारांपेक्षा जास्त विहिरी वेगवेगळ्या ठिकाणी खोदल्या जातात. इतकच नाही शास्त्रज्ञांचा असाही अंदाज आहे की 2050 पर्यंत अशा प्रकारचं खोदकाम हे सहा पटींनी वाढू शकतं. तेल शोधण्यासाठी अशा प्रकारे पृथ्वीवर ठीक ठिकाणी मोठमोठे होल केले जात आहेत. भूकंपाच्या मानवनिर्मित कारणांमध्ये खाणकाम हे प्रमुख कारण मानले जात आहे. भारत आणि अन्य काही देशांमध्ये कोळसा, ॲल्युमिनियम, पेट्रोलियम पदार्थ, ग्रेनाईट अशा अनेक खनिज पदार्थांचे उत्खनन केलं जातं. यासाठी मोठमोठे स्फोट घडवले जातात. उत्खननामुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी भूगर्भात तीव्र कंपने होतात. स्फोट हे त्याचे प्रमुख कारण असून वायू आणि भूगर्भातील द्रव पदार्थाची गती त्यामुळे वाढते. त्यामुळेच आपल्याला भूकंपाचे हादरे बसतात..

चला तर मग तुम्हाला भूकंप म्हणजे काय? हे समजलं असेल तो कसा होतो याची नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे देखील तुम्हाला थोडीफार का असेना पण समजले असतील. पण मानवनिर्मित करणे ऐकल्यानंतर तुम्हाला थोडा धक्का बसला असेल. मानव विकासाच्या नावाखाली आणखीन काय काय करणार आहे कोणास ठाऊक? बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा, अशाच नवनवीन माहितीपूर्ण माहितीसाठी MaxWoman फॉलो करा..

Updated : 22 March 2023 4:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top