- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?
- "मॅडम मी खूप टेन्शन मध्ये आहे, आमचा आमदार गुवाहाटीला आहे.." Audio Clip Viral
- आता या सहा मुली ही जाणार गुवाहाटीला..
- आदित्य ठाकरेंची थेट धमकी, आत एकनाथ शिंदेंचे काय होणार?
- Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..
- बंडखोर शिंदे गटाचे नाव ठरले 'शिवसेना...'
- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी अभियानाची सुरुवात

पश्चिम बंगालची निवडणूक एकाच टप्प्यात होणार का? काय म्हटलंय निवडणूक आयोगाने..
ममता बॅनर्जींची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली, मात्र, ममता बॅनर्जींच्या पत्रामुळं निवडणूक आयोगाने घेतले मोठे निर्णय वाचा कोणते आहेत हे निर्णय
X
कोरोना विषाणूमुळे वाढत चाललेल्या भयावह परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूका एकाच टप्प्यात घ्या. अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. पश्चिम बंगाल मध्ये८ टप्प्यात मतदान होत असून अजून चार टप्पे बाकी आहेत. ममता बॅनर्जी यांच्या या मागणीनंतर या संदर्भात आज पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आले आहेत. संध्याकाळी ७ नंतर आता कोणताही राजकीय पक्ष बंगालमध्ये मोर्चा काढू शकणार नाही किंवा प्रचार करू शकणार नाही, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
काय आहे नवीन नियम?
मतदानाच्या ७२ तासांपूर्वीच निवडणूकीचा प्रचार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ही मुदत ४८ तासांची होती. मात्र, बंगालमधील उरलेल्या सर्व निवडणुकीचा चरणामध्ये ७२ तासांपूर्वीच प्रचार बंद केला जाईल असा निर्णय देण्यात आला आहे.
तसेच निवडणूक प्रचारादरम्यान रात्री ७ ते १० या वेळेत प्रचार करणे किंवा प्रभातफेरी काढणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे. याशिवाय कोरोना नियमांचे पालन करणे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदारांना अनिवार्य असेल. जर तसे झाले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सर्व सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी मास्कचा वापर करणे आणि नियम पाळणे यावर लक्ष ठेवण्याचे काम आयोजकांचे असल्याचे सुद्धा निर्बंधांमध्ये सांगण्यात आले आहे.