Home > News > अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची सखोल चौकशी करू - पोलीस अधीक्षक आर. राज

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची सखोल चौकशी करू - पोलीस अधीक्षक आर. राज

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची सखोल चौकशी करू - पोलीस अधीक्षक आर. राज
X

राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच अंगावर शहारे आनणारी घटना बीड मधून समोर आली आहे. चक्क सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर त्यांच्या ओळखीच्या लोकांनी जेवण देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला असल्याची फिर्याद संबधीत पीडित मुलीने दाखल केली आहे.

या घटनेविषयी बीडचे पोलीस अधीक्षक आर. राज यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या संबंधीत मुलीने फिर्याद दाखल केली असून त्यामध्ये तिने वयाच्या 13 व्या वर्षी वडील व नातेवायकांनी तिचा बालविवाह करून दिला. व त्यानंतर काही दिवसानंतर नावऱ्यासोबत पटत नसल्या कारणाने ती मुलगी आंबेजोगाईला परत आली. मात्र तिला वडील त्रास देत असल्या कारणाने ती एकटीच राहत होती. त्यानंतर 15 दिवसांपूर्वी तिच्या ओळखीच्या लोकांनी तिला जेवण देण्याचे आमिष दाखवून घेऊन गेले व तिच्यासोबत अत्याचार केले अशी फिर्याद पीडित अल्पवयीन मुलीने दाखल केली आहे. त्या आधारावर बालविवाह अधिनियम व अत्याचार केल्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केले असल्याचे अधीक्षक आर. राज यांनी सांगितले.

8 नोव्हेंबरला 9 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यामधी 1 आरोपी व वडिलांना यांना अटक केली आहे. उर्वरित आरोपी लवकरात लवकर अटक करू असे देखील बीडचे पोलीस अधीक्षक आर. राज यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.


Updated : 13 Nov 2021 3:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top