Home > News > अमृता फडणवीस यांचे यशोमती ठाकूर यांच्याकडून कौतुक की चिमटा?

अमृता फडणवीस यांचे यशोमती ठाकूर यांच्याकडून कौतुक की चिमटा?

अमृता फडणवीस यांचे यशोमती ठाकूर यांच्याकडून कौतुक की चिमटा?
X

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाऊबिजेनिमित्त त्यांच्या आवाजातील गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. पण त्यांच्या या पोस्टवर लाईक्सपेक्षा डिसलाईक्सचा पाऊस पडला. तर अनेकांनी अमृता फडणवीस यांना ट्रोल केले. त्यांच्या आवाजातील गाणे वाईट असल्याची टीका काहींनी केली.

पण राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी मात्र अमृता फडणवीस यांच्या गाण्याबद्दल वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबुवर अमृता फडणवीस यांनी गाण्यातून महत्त्वाचा विषय मांडल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटले ते पाहूया,

"सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. माझ्या शुभेच्छा !! "


Updated : 20 Nov 2020 8:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top