Home > News > WCD विभागाच्या आयुक्तपदी आर.विमला यांची निवड

WCD विभागाच्या आयुक्तपदी आर.विमला यांची निवड

WCD विभागाच्या आयुक्तपदी आर.विमला यांची निवड
X


महिला आणि बाल विकास विभागाच्या नवीन आयुक्त म्हणून श्रीमती आर विमला यांची नियुक्ती झाली आहे. 2021 मध्ये नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.

मूळच्या तामिळनाडू येथील आर. विमला यांचा जन्म महाराष्ट्रातील भुसावळ येथील आहे. त्या २००९ सालच्या आयएएस अधिकारी आहेत. बीए, एमएची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणूनही काम केले. कोकणात उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली. जलजीवन मिशनलाही त्यांनी काम केले आहे. 'उमेद', 'यशोगाथा'सारखे उपक्रम राबविणाऱ्या आर. विमला यांनी महिला सक्षमीकरणावर काम केले आहे. मंत्रालयात उपसचिव पदाचाही अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

Updated : 22 Aug 2022 7:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top