Home > News > मुंबईत जानेवारीपासून वॉटर टॅक्सी सेवा; मुंबई नवी मुंबई असा प्रवास होणार अवघ्या 15 मिनिटांत

मुंबईत जानेवारीपासून वॉटर टॅक्सी सेवा; मुंबई नवी मुंबई असा प्रवास होणार अवघ्या 15 मिनिटांत

मुंबईत जानेवारीपासून वॉटर टॅक्सी सेवा; मुंबई नवी मुंबई असा प्रवास होणार अवघ्या 15 मिनिटांत
X

नवीन वर्षापासून म्हणजेच जानेवारी २०२२ पासून मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. ही सेवा मुंबई ते नवी मुंबई अशी असेल. या टॅक्सीमुळे दोन शहरांमधील अंतर आणि वेळ कमी होईल. म्हणजेच मुंबईहून नवी मुंबईला तुम्ही अवघ्या 15 मिनिटांत पोहोचू शकता. यापूर्वी ही जलमार्ग सेवा मार्च 2021 मध्ये सुरू होणार होती, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती त्यावेळी सुरू होऊ शकली नाही.

मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन लवकरच होईल असं म्हंटल जात आहे. ही टॅक्सी सेवा चालवण्याचा परवाना इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस LLP आणि वेस्ट कोस्ट मरीन या दोन खाजगी कंपन्यांना देण्यात आला आहे.

हा टॅक्सी सेवेचा मार्ग कसा असेल..

वॉटर टॅक्सी मुंबई ते एलिफंटा आणि जेएनपीटी पर्यंत 15 मिनिटात आणि मुंबई ते बेलापूर, नेरुळ, वाशी आणि रेवस असा 25-30 मिनिटांत प्रवास करेल. हा मार्ग माझगाव येथील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलपासून सुरू होऊन बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली, रेवस (अलिबागजवळ), जेएनपीटी, करंजाडे आणि माझगाव येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या एलिफंटा लेणी येथे संपेल.

ही वॉटर टॅक्सी 14 ते 50 सीटर असेल

इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसकडे चार जहाज असतील. येथे 50 आसनी, 40 आसनी, 32 आसनी आणि एक 14 आसनी वॉटर टॅक्सी आहेत, तर वेस्ट कोस्ट मरीन मध्ये दोन 12 आसनी आणि एक 20 आसनी जहाज आहे.

भाडे 1 हजार ते 1200 पर्यंत असू शकते

वेळ वाचवणारा लक्झरी प्रवासाचा अनुभव देणारा, मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सीचे भाडे प्रति प्रवासी रु. 1 हजार ते बाराशेच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे, तर JNPT आणि एलिफंटाचे भाडे 750 रुपये असण्याची शक्यता आहे. भाडे खूपच जास्त आहे, परंतु प्रवाशांची संख्या वाढल्याने हे दर कमी होतील. सहकारी संस्था चालवल्या जाणाऱ्या वॉटर टॅक्सींचे तिकीट 350 रुपये असण्याची शक्यता आहे. त्यांना अंतर कापण्यासाठी अधिक वेळ सुद्धा लागेल.

Updated : 30 Dec 2021 4:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top