Home > News > हडपलेल्या आरक्षित जागेसाठी महिलांचा मरेपर्यंत लढण्याचा इशारा

हडपलेल्या आरक्षित जागेसाठी महिलांचा मरेपर्यंत लढण्याचा इशारा

हडपलेल्या आरक्षित जागेसाठी महिलांचा मरेपर्यंत लढण्याचा इशारा
X

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील निगडे हद्दीतील गट नंबर , सर्वे नंबर ४८ येथील जवळपास ३ ते ४ एकर गावठाण बेकायदेशीरपणे हडप करण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे येथील महिला व ग्रामस्थ आक्रमक झालेत, आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी संतप्त ग्रामस्थानी पेण प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले. व प्रशासनाला धारेवर धरत नकाशावर महारवाडा अशी नोंद असलेली राखीव जागा बौद्ध समाजाला तत्काळ देण्यात यावी , अशी जोरदार मागणी केली.

अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आम्हाला ज्ञात आहे. त्यामुळे आम्ही अन्याय सहन करणार नसून आम्ही आमच्या न्यायहक्कांसाठी शेवटपर्यंत प्राणपणाने लढणार असा इशारा निगडे येथील बौद्ध समाजाच्या महिलांनी दिलाय. ही जागा बौद्ध समाजाच्या नावावर असल्याचा गावाच्या नकाशात उल्लेख आहे . मात्र , अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी गेली असल्याने या जागेवर अनेकांनी बेकायदेशीरपणे घरे बांधलेली आहेत . याबाबत वारंवार शासनाकडे उपोषण पत्रव्यवहार करण्यात आला आहे . पण शासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष देवेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निगडे ग्रामस्थांनी उपोषणास सुरुवात केली आहे . तसेच जागा मिळाली नाही तर उग्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे . दरम्यान निगड़े ग्रामसेवक विशाखा पेडवी यांनी आन्दोलकांची भेट घेऊन सदर जागेच्या मोजनीकामी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली असून मोजनी नंतर चित्र स्पष्ट होईल, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. असे स्पष्ट केले.

Updated : 22 April 2022 12:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top