Home > News > 'भोXडी वाली..,माXXXद.." महिलेला इतक्या खालच्या स्थराला जात भाजप नेत्याची शिवीगाळ

'भोXडी वाली..,माXXXद.." महिलेला इतक्या खालच्या स्थराला जात भाजप नेत्याची शिवीगाळ

भोXडी वाली..,माXXXद.. महिलेला इतक्या खालच्या स्थराला जात भाजप नेत्याची शिवीगाळ
X

एका महिलेसोबत अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला आणि तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ करणारा व्यक्ती श्रीकांत त्यागी हे असून ते भाजपचे स्थानिक नेते आहेत. या व्हिडिओ मध्ये ते एका महिलेला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बागेत असलेल्या झाडांना हात लावला तर मी तुला हात लावेन असं म्हणत आहेत. या महिलेला अपशब्द वापरत असलेल्या या भाजप नेत्याचा व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर चांगलाच व्हयरल होतं आहे. हा व्हिडिओ नोएडाच्या सेक्टर-93 ओमॅक्स ग्रँड सोसायटीमधील आहे.

या सगळ्या प्रकारानंतर त्या सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी असं सांगितले आहे की, "श्रीकांत हा कॉमन एरियात झाडे लावून पार्कच्या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करत आहे. सोसायटीतील लोकांनी विरोध केल्यावर त्याने हे अश्लील कृत्य केले आहे. याबाबत सोसायटीच्या रहिवाशांनी फेज-२ पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे.

महिलेने विरोध केला त्यानंतर..

सोसायटीत राहणाऱ्या महिलेने श्रीकांत त्यागी यांना त्या जागेवर झाडे लावण्यास नकार दिल्याने त्याने सोसायटीतील लोकांसमोर महिलेला शिवीगाळ केली. हा सगळं प्रकार समोर आल्यानंतर लोकांनी याला कडाडून विरोध करत गोंधळ घातला. त्यानंतर महिलांनी अवैध कब्जा करण्याच्या उद्देशाने लावलेली झाडांची रोपे देखील काढून टाकली.

पोलिसात तक्रार दाखल..

गोंधळ वाढत असल्याचे पाहून पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लोकांना समजून घेत शांत केले. लोकांनी श्रीकांत विरोधात तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत याआधीही अनेकदा गदारोळ झाल्याचे सोसायटीतील लोकांनी सांगितले. अशा परिस्थितीत त्याची तक्रार नोएडा प्राधिकरणाकडे आणि अगदी खासदारांकडेही करण्यात आली होती. त्यावर प्राधिकरणाने नोटीस देखील बजावली होती.

Updated : 6 Aug 2022 3:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top