Home > News > बॉलीवूड अभिनेता सोनू सूदला उत्तर रेल्वेने सुनावले खडे बोल, असं नक्की काय झालं?

बॉलीवूड अभिनेता सोनू सूदला उत्तर रेल्वेने सुनावले खडे बोल, असं नक्की काय झालं?

बॉलीवूड अभिनेता सोनू सूदला उत्तर रेल्वेने सुनावले खडे बोल, असं नक्की काय झालं?
X

बॉलीवूड अभिनेता सोनू सूदला रेल्वेच्या फूटबोर्डवर बसून प्रवास केल्याबद्दल उत्तर रेल्वेने चांगलेच फटकारले आहे. ते धोकादायक ठरू शकते, असे रेल्वेने म्हटले आहे. कृपया असे करू नका कारण यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल.

सोनू सूदने 13 डिसेंबर रोजी ट्विटर आणि फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. पार्श्वभूमीत 'मुसाफिर हूं यारों' हे प्रसिद्ध बॉलीवूड गाणे वाजत होते आणि सून ट्रेनच्या पायरीवर बसलेला दिसला.

रेल्वेने सूद यांना या प्रकरणावरूनच सुनावले आहे..

उत्तर रेल्वेने 3 जानेवारी रोजी सूद यांचे ट्विट रिट्विट केले, की प्रिय सोनू सूद, तुम्ही देश आणि जगातील लाखो लोकांसाठी आदर्श आहेत. ट्रेनच्या पायऱ्यांवर प्रवास करणे धोकादायक आहे, अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे तुमच्या चाहत्यांना चुकीचा संदेश जाऊ शकतो. कृपया असे करू नका. सुरळीत आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या.

लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे..

सोनूचा व्हिडिओ ट्विटरवर 6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. शेकडो लोकांनी रिट्विट केले आहे. फेसबुकवर 2 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 4 हजारांहून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. काही लोकांनी त्याला कमेंटमध्ये सावध राहण्यास सांगितले.

Updated : 5 Jan 2023 3:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top