Home > News > पोलिसांची लाठी झाली होडीची काठी; मुंबईकरांनी प्रशासनाला व्हिडिओतून मारलेला टोमणा पाहाच...

पोलिसांची लाठी झाली होडीची काठी; मुंबईकरांनी प्रशासनाला व्हिडिओतून मारलेला टोमणा पाहाच...

पोलिसांची लाठी झाली होडीची काठी;  मुंबईकरांनी प्रशासनाला व्हिडिओतून मारलेला टोमणा पाहाच...
X

मुंबईत झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली असल्याचा पुन्ह एकदा पाहायला मिळाले. यात अनेक भागात पाणी साचले असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. याच पावसाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलीस वसाहतमध्ये असलेल्या घरात गुडघाभर पाणी तुंबले असल्याने, घरातील मुलांनी हातात पोलीस लाठ्या घेऊन होडी केली. पंथनगर पोलीस वसाहतमधील बिल्डिंग क्रमांक ६४ मध्ये असलेल्या घरात काल झालेल्या पावसामुळे पाणी साचले होते. घरात गुडघाभर पाणी असल्याने घरच्यांना पलंगावर बसून राहावे लागले. अशात दोन चिमुकल्यांनी मजेदार व्हिडिओ बनवत प्रशासकीय यंत्रणेला टोमणा लगावला आहे. पलंगावर बसलेल्या या मुलांनी हातात पोलीस लाठी घेत घरात साचलेल्या पाण्यात होडी चालवली, सोबतच कोकणी गाणे सुद्धा लावले आहे.

मुंबई आणि उपनगरात काल पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी लोकल सेवा सुद्धा बंद पडल्याचे पाहायला मिळाले. मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दल पाणी उपसण्याचे काम करत आहे. मात्र पुढील तीन-चार दिवस असेच पाणी सुरु असणार असल्याचा इशारा हवमान खात्याने दिला आहे.

Updated : 20 July 2021 3:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top