Home > News > आत्महत्येपूर्वी बनवला VIDEO; मित्रांना म्हणाला गर्लफ्रेंडचं लग्न होऊ देऊ नका

आत्महत्येपूर्वी बनवला VIDEO; मित्रांना म्हणाला गर्लफ्रेंडचं लग्न होऊ देऊ नका

आत्महत्येपूर्वी बनवला VIDEO; मित्रांना म्हणाला गर्लफ्रेंडचं लग्न होऊ देऊ नका
X

मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये एका तरुणाने प्रेमप्रकरणातून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी तरुणाने मोबाईलवरून व्हिडिओ बनवला असून, व्हिडिओमध्ये त्याने प्रेयसीच्या वडिलांवर आणि तिच्या नातेवाईकावर आरोप केला आहे की, त्यांनी तरुणाला जीवे मारण्याची आणि बलात्कार प्रकरणात गोवण्याची धमकी दिली होती. यासोबतच तरुणाने व्हिडीओतील मित्रांना सांगितले की, मृत्यूनंतर त्याच्या गर्लफ्रेंडच लग्न होऊ देऊ नका. व्हिडीओ बनवल्यानंतर तरुणाने तो मित्रांना पाठवला आणि गळफास घेतला.

घटना मंदसौर जिल्ह्यातील संदलपूर गावातील आहे. जीव गमावलेल्या सुनील पाटीदार नावाच्या तरुणाचं दुसऱ्या गावातील मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र मुलीच्या कुटुंबाचा याला विरोध होता. त्यामुळे सुनीलला 24 ऑक्टोबर रोजी मुलीकडच्या लोकांनी मारहाण केल्याचा आरोप सुनीलच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.

मारहाण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुनीलने आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी सुनीलने आपल्या तीन मित्रांना एक व्हिडिओ रेकोर्ड करून पाठवला होता. ज्यात प्रेयसीच्या वडील आणि नातेवाईकांनी सुनीलला जीवे मारण्याची आणि बलात्कार प्रकरणात गोवण्याची धमकी दिली होती. यासोबतच सुनीलने व्हिडीओतील मित्रांना सांगितले की, मृत्यूनंतर त्याच्या गर्लफ्रेंडच लग्न होऊ देऊ नका. तसेच मी गेल्यानंतर माझ्या आई-वडिलांची काळजी घेण्याची विनंती मित्रांना केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Updated : 28 Oct 2021 8:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top