Latest News
Home > News > स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत रेखा ठाकूर यांची महत्वाची घोषणा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत रेखा ठाकूर यांची महत्वाची घोषणा

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी जालन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महत्वाची घोषणा केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत रेखा ठाकूर यांची महत्वाची घोषणा
X

राज्यात येत्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार आहे, अशी घोषणा घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केली आहे. जालन्यात पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभरात संवाद, समीक्षा आणि बांधणीच्या दृष्टीने रेखा ठाकूर यांचा दौरा सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही कुठल्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर लढवू असे ठाकूर यांनी सांगितले आहे.

"मराठा समाजात घराणेशाही आणि नातेगोत्यांच्या राजकारणामुळे गरीब मराठ्यांवर अन्याय होत आहे. गरीब आणि मागासलेल्या मराठा समाजाबद्दल आम्हाला सहानुभूती असून कायद्यानुसार त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षणासाठी 50 टक्केची मर्यादा नसून अनेक राज्यांनी गरजू आणि वंचित समाजाला 50 टक्के मर्यादेबाहेर जाऊन आरक्षण दिलेला आहे. मात्र ओबीसीच्या कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे," असे मत रेखा ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

Updated : 2 Sep 2021 2:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top