Home > News > कोण आहेत वानथी श्रीनिवासन ज्यांनी कमल हसन सारख्या स्टार उमेदवाराचा पराभव केला?

कोण आहेत वानथी श्रीनिवासन ज्यांनी कमल हसन सारख्या स्टार उमेदवाराचा पराभव केला?

कोण आहेत वानथी श्रीनिवासन ज्यांनी कमल हसन सारख्या स्टार उमेदवाराचा पराभव केला?
X

तमिळनाडू विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणूकीत चर्चा होतेय ती 'वानथी श्रीनिवासन' या नावाची. मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांना तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोयंबटूर दक्षिण जागेवर पराभव पत्करावा लागला. कमल हसन यांना पराभूत करणारी व्यक्ती इतर कोणी नसून वानथी या आहेत. कमल हसन दाक्षिणात्य व बॉलिवूड सुपरस्टार आहेत. त्यांचे अनेक चित्रपट हिट आहेत. अशा सुपरस्टार कमल हसनचा वानथी यांनी पराभव केल्याने त्या सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत.

कोण आहेत वानथी श्रीनिवासन?

वानथी या पेशाने वकील आहेत. 1987 मध्ये, तामिळनाडूमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य सहसचिव म्हणून काम पाहिले. 2004 ते 2009 दरम्यान त्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस झाल्या. 2020 साली पक्षाने त्यांना भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. दरम्यान, या विधानसभा निवडणूकीत विजयी होऊन वानथी यांनी आपले पक्षातील स्थान अधीक भक्कम केलं आहे.

Updated : 4 May 2021 9:22 AM GMT
Next Story
Share it
Top