Home > News > पतीचे क्रौर्य.... गर्भवती पत्नीची प्रकृती चिंताजनक

पतीचे क्रौर्य.... गर्भवती पत्नीची प्रकृती चिंताजनक

पतीचे क्रौर्य.... गर्भवती पत्नीची प्रकृती चिंताजनक
X

सहावी मुलगीच होणार असल्याचे मांत्रिकाने सांगितल्यानंतर तिच्या गर्भात वाढणारे बाळ मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्यासाठी पतीने गर्भवती पत्नीच्या पोटावर चाकूने वार केले. उत्तर प्रदेशात शनिवारी ही घटना घडली. सदर प्रकरणातील पीडितेला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची प्रकृती खालवल्याने तिला दिल्लीतील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. मंगळवारी या महिलेने मृत अर्भकाला जन्म दिला. महिलेची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

आरोपी पन्नालाल याला मुलगा हवा होता. तिच्या गर्भात मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्यासाठी त्याने पोटावर वार केले. पन्नालाल याला पाच मुली आहेत. सहाव्यांदा त्याची पत्नी गरोदर राहिली. तिने कोणत्या तरी मांत्रिकाला हात दाखवल्यानंतर सहावी मुलगीच होणार असल्याचे त्याने सांगितले. त्याने शनिवारी रात्री पत्नीला गर्भपात करण्यास सांगितले. पत्नीने नकार दिला. त्यानंतर त्याने तिच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

दरम्यान, स्त्री-पुरुष समानतेबाबत नेहमीच चर्चा चर्चा सुरु असते. अनेक नेते मंडळी आपल्या भाषणांमध्ये याचा उल्लेख करतात, सोशल मिडियावरही याबाबत नेहमीच बोलणे होते. आजकाल जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मात्र तरिही अशा घटना घडत असतील तर प्रबोधनाचे प्रयत्न नेमके कुठे कमी पडत आहेत? हे तपासणं गरजेचं आहे.

Updated : 23 Sep 2020 4:13 AM GMT
Next Story
Share it
Top