Home > News > कंडोम वापरला म्हणजे दोघांच्या सहमतीनं सेक्स झाला असा याचा अर्थ होतं नाही: न्यायालय

कंडोम वापरला म्हणजे दोघांच्या सहमतीनं सेक्स झाला असा याचा अर्थ होतं नाही: न्यायालय

कंडोम वापरला म्हणजे दोघांच्या सहमतीनं सेक्स झाला असा याचा अर्थ होतं नाही: न्यायालय
X

कंडोम वापरला म्हणजे दोघांच्या सहमतीनं सेक्स झाला असा याचा अर्थ होतं नाही अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी एका बलात्कार प्रकरणी सुनावणी करत असताना मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री जे घरत यांनी केली आहे. नौदलातील एका जवानानं त्याच्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. यावर सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे.

भारतीय नौदलातील एका जवानानं त्याच्याच एका सहयोगी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला असून, सध्या न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. तर संशयित आरोपीच्या वकिलाकडून असा दावा करण्यात आला की, पीडितेसोबत ठेवण्यात आलेले शारीरिक संबंध दोघांच्या संमतीनं ठेवण्यात आले आहेत. या संबंधादरम्यान जवानाकडून कंडोम देखील वापरलं असल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला होता.

तर, 'केवळ घटनास्थळी कंडोम होते, त्यामुळे आरोपीनं तक्रारदाराशी सहमतीनं संबंध प्रस्थापित केले होते, असं म्हणणं पुरेसं नाही. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी कंडोमचा वापर केला गेला.' अशी टिप्पणी न्यायालयानं केली आहे.

Updated : 5 Sep 2021 4:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top