Home > News > '...तर कमला शो पुढे नेतील' कंगनाची भविष्यवाणी

'...तर कमला शो पुढे नेतील' कंगनाची भविष्यवाणी

अमेरिकेला कमला हॅरिस यांच्या रुपात पहिल्यांदाच महिला उपराष्ट्राध्य मिळाला आहे. त्यामुळे हॅरिस यांचे जगभरातून अभिनंदन होत आहे.

...तर कमला शो पुढे नेतील कंगनाची भविष्यवाणी
X

अभिनेत्री कंगणा रणौत ने अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचं समर्थन केलं आहे. या सोबतच कमला हॅरिस अमेरिकेच्या पुढील शो चे नेतृत्व करणार असं भाकितही केलं आहे. त्यामुळे कंगनाचे हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाने अमेरिकेला कमला हॅरिस यांच्या रुपात पहिल्यांदाच महिला उपराष्ट्राध्य मिळाला आहे. त्यामुळे हॅरिस यांचे जगभरातून अभिनंदन होत आहे.

अभिनेत्री कंगनाने ही ट्वीट करत कमला हॅरिस यांचे अभिनंदन केलं आहे. यात तिने "ज्यांचा डाटा 5 मिनिटांनी क्रॅश होतो त्यांच्यावर मला खात्री नाही. बायडन वर्षभरही सत्तेत राहणार नाहीत. कमला हॅरिस अमेरिकेच्या पुढील शो चे नेतृत्व करणार आहेत. जेव्हा एक स्त्री जागी होते तेव्हा ती दुसऱ्या स्त्रीसाठी एक नाव मार्ग तयार करते. हा ऐतिहासिक दिवस आपण साजरा केला पाहिजे." असं कंगनाने म्हटलं आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1325288675056312325

Updated : 9 Nov 2020 10:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top