Home > News > ड्रग पेडलर जयदीप राणा अमृता फडणवीसांनी गायलेल्या गाण्याचा फायनान्स हेड: नवाब मलिक

ड्रग पेडलर जयदीप राणा अमृता फडणवीसांनी गायलेल्या गाण्याचा फायनान्स हेड: नवाब मलिक

ड्रग पेडलर जयदीप राणा अमृता फडणवीसांनी गायलेल्या गाण्याचा फायनान्स हेड: नवाब मलिक
X

रोज धक्कादायक आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विटरवरुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मलिक यांनी भाजपा आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे.

"चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है," अशा कॅप्शनसहीत हा फोटो नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केला आहे.

हे काय आम्हाला धमक्या देत आहेत, यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. मी विधानसभेत जे प्रकरण आणणार आहे ते समोर आल्यानंतर भाजपचा नेता व कार्यकर्ता जनतेसमोर जाऊ शकणार नाही, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता "आज ज्यांच्यावर आरोप होते ते बाहेर आले आणि जे आरोप करत होते ते आरोपांच्या पिंजर्‍यात आहेत. एकंदरीत सिनेमाचा सिक्वेन्स बदलला आहे. त्याचा अंत तर होणारच आहे आणि जोपर्यंत हे प्रकरण धसास लावत नाही तोपर्यंत थांबणार नाही,असा इशारा मलिकांनी दिला आहे.


चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा ? नवाब मलिकांना अमृता फडणवीसांचे उत्तर

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या याच आरोपाला आता अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उत्तर दिला आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की , चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा ? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !


Updated : 1 Nov 2021 5:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top