Home > News > उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना धरले धारेवर..

उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना धरले धारेवर..

उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना धरले धारेवर..
X

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात सुरू असलेला वाद पाहिल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, राज्यातील महिलांचे तसेच इतर अनेक महत्त्वाचे सर्व प्रश्न संपून गेले की काय? राज्याच्या राजकारणात सध्या उर्फी जावेदची जोरदार चर्चा आहे. या एका नवख्या अभिनेत्रीची राज्याच्या राजकारणात चर्चा होण्याचं कारण आहे तिचे हटके कपडे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही असं म्हणत तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. आणि त्यानंतर उर्फी जावेद व चित्रा वाघ वाद सुरू झाला...

या दोघींमध्ये सुरू असलेला हा वाद मागच्या अनेक दिवसांपासून मिटण्याची काही चिन्हे दिसत नाही आहेत. चित्रा वाघ आता उर्फी जावेद विरोधात आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे त्यांना जशास उत्तर उत्तर उर्फी कडून दिले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रा वाघ यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत ''चार भिंतींच्या आत काहीही कर, पण बाहेर उघडं-नागडं फिरु देणार नाही, हा समाजस्वास्थ्याचा विषय आहे'' अशी ठाम भूमिका मांडली. तर या पत्रकार परिषदेला उर्फीने पुन्हा एकदा ट्वीट करत उत्तर दिलं आहे.

उर्फीने ट्विट करत म्हंटले आहे की, ''एकीकडे त्यांना हिंदु राष्ट्र हवे आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे आहेत. हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे, तो स्त्रियांचा नेहमीच आदर करणार म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कुठल्या संस्कृतीबद्दल बोलताय? हिंदू उदारमतवादी, शिक्षित व स्त्रियांना त्यांचे कपडे निवडण्याची मुभा होती, स्त्रियांचा खेळ, राजकारणात सक्रिय सहभाग होता. प्रथम भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्या. मी तुम्हाला सांगते की संस्कृतीचा भाग काय नाही? बलात्कार, डान्स बार, राजकारण्यांनी महिलांना त्यांच्या कपड्यांवरून उघड धमक्या देणं हे सगळं आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग नाही. असं म्हणत उर्फीने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना लक्ष करत, आधी हिंदू संस्कृती म्हणजे काय यांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे...

Updated : 15 Jan 2023 6:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top