Home > News > यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर... देशात पहील्या तीन मध्ये मुलींची बाजी...

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर... देशात पहील्या तीन मध्ये मुलींची बाजी...

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर... देशात पहील्या तीन मध्ये मुलींची बाजी...
X

देशभराचे लक्ष लागून असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC Result) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी कोरोनामुळे मुलाखत प्रक्रिया लांबणीवर पडली होती. त्यामुळे निकालालाही उशीर झाला. युपीएससीमध्ये जागृती अवस्थी ही देशात दुसरी तर अंकिता जैन तिसरी क्रमांक पटकावला आहे . शुभम कुमार याने सर्वाधिक गुण मिळवत देशात पहिला आला आहे.

नागरी लोकसेवा आयोग 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातून 263 तर आर्थिक मागास प्रवर्गातून 86, अन्य मागास प्रवर्गातून 229 तर अनुसूचित जाती 122, अनुसूचित जमाती 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगतर्फे वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. आयोगातर्फे 180 आयएएस, 36 आयएफस, 200 आयपीएस, सेंट्रल सर्व्हिस ग्रप ए 302, ग्रुप बी सर्व्हिस 118 अशा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 836 नुयक्त्या केल्या जाणार आहेत.

-नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल जाहीर

-परीक्षार्थी https://www.upsc.gov.in/ या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात.

-या परीक्षेमध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण

-शुभम कुमार यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

-जागृती अवस्थी दुसरी आणि अंकिता जैन तिसरी क्रमांक पटकावला आहे

Updated : 24 Sep 2021 4:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top