Home > News > संतापजनक : युपीत 35 वर्षीय दलीत महिलेवर सामूहिक बलात्कार

संतापजनक : युपीत 35 वर्षीय दलीत महिलेवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन आरोपींनी 300 रुपयांमध्ये विकला व्हिडिओ

संतापजनक : युपीत 35 वर्षीय दलीत महिलेवर सामूहिक बलात्कार
X

उत्तर प्रदेशच्या बदायूंमधील एका 35 वर्षीय महिलेसोबत सामूहिक बलात्कार करुन आरोपींनी घटनेचा व्हिडीओ 300 रुपयांना विकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एवढच नाही तर आरोपींनी पीडितेला घटनेबद्दल कोणाला सांगीतले तर नवरा आणि मुलांना ठार मारेल अशी धमकी दिली.

जेव्हा या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा पीडितेने पोलिस ठाण्यात आरोपींविरूद्ध तक्रार दाखल केली. दरम्यान, महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिलेने सांगितले की, सुमारे पाच महिन्यांपूर्वी ती जंगलात लाकूड गोळा करायला गेली होती. त्यावेळी पाच तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, तर सहाव्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ बनविला.

Updated : 2 Feb 2021 10:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top