Home > News > सर्वसामान्यांची निराशा करणारा अर्थसंकल्प, नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत पहा..

सर्वसामान्यांची निराशा करणारा अर्थसंकल्प, नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत पहा..

सर्वसामान्यांची निराशा करणारा अर्थसंकल्प, नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत पहा..
X

काल देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. मात्र हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना गुंतवून ठेवून शासन स्वत:ची पोळी भाजत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे.

काल संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प हा सर्वसामान्य लोकांसाठी असतो. पण या वर्षी जो अर्थसंकल्प सादर केला त्याचा सर्वसामान्यांना काहीच फायदा झाला नाही. परंतु त्यांच्या फायद्याच्या वस्तु या स्वस्त करुन ठेवायच्या आणि नागरिकांना त्यामध्ये गुंतवणुक ठेवायचं. ही एक शासनाची किमया आहे. शासन हे सर्वसामान्यांना न्याय देत नाही. असा आरोप मुंबईकरांनी लावला आहे.

सर्वसामान्यांना शासन हे फक्त भुलथापा देत असते आणि या सर्व गोष्टींवर आपले वर्चस्व गाजवत असते. सर्वसामान्यांना गुंतवुन ठेवले नाही तर स्वत:ची पोळी भाजता येणार नाही. असा आरोप नागरिकांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रया देताना केला. नागरिकांना आम्ही सर्व सोयीसुविधा पुरवणार असे आश्वासन केंद्र सरकार देत असते. इलेक्ट्रिक वाहन, टी.व्ही पॅनल, मोबाईल फोन, हिऱ्याचे दागिने, आणि सायकल या सर्व गोष्टी स्वस्त झाल्या असुन, सोन- चांदी, सिगरेट, इलेक्ट्रिक किचन चिमणी, परदेशी इलेक्ट्रिक वाहने महाग झाली आहेत. परंतु सर्वसामान्यांच्या मुलभुत सुविधा आणि त्यांना रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचा शासनाने विचार न केल्याचे दिसुन येत आहे. २०२३ च्या अर्थसंकल्पनाकडून नागरिकांना खुप अपेक्षा होत्या. परंतु अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांसाठी समाधानकारक काही निर्णय न आल्याने सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Updated : 2023-02-02T13:32:17+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top