Home > News > कोराना नियंत्रणात अपयश आल्याने या देशात सरकारची सेक्स वर बंदी

कोराना नियंत्रणात अपयश आल्याने या देशात सरकारची सेक्स वर बंदी

कोराना नियंत्रणात अपयश आल्याने या देशात सरकारची सेक्स वर बंदी
X

इंग्लंडची सध्या करोना संसर्गाच्या दृष्टीने धोकादायक झोनमध्ये आहे. त्यामुळे काहींच्या मते पुढच्या काही महिन्यांमध्ये सेक्स हा करोनाप्रसाराला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतो. ते रोखण्यासाठी युनायटेड किंग्डममध्ये आता सरकारने 'सेक्स बंदी' आणली आहे. या नवीन नियमानुसार एकत्र राहणारे आणि त्याच 'सपोर्ट बबल'मध्ये राहणारे लोक लॉकडाऊनच्या काळात एकमेकांना एकांतात भेटू शकतात.

कोरोनाच्या काळात तीन भाग करण्यात आले आहेत. टिअर १, टिअर २, टिअर ३. यामधील टिअर २ आणि टिअर ३ मध्ये हाय रिस्क आणि सर्वाधिक रिस्कचा समावेश आहे. टिअर १ मध्ये मीडिअम रिस्क असणाऱ्या भागात कव्हर करणार आहेत. नवीन नियमानुसार, हाय रिस्क आणि सर्वाधिक रिस्क असणाऱ्या विभागातील लोकांना एकमेकांना भेटण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे.

या विषयावर पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रवक्ताने म्हटलंय की, 'काही हॉटस्पॉटमध्ये कपल्स आणि सिंगल राहणाऱ्या लोकांना भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यांनी सोशल डिस्टेन्सिंगचे सर्व नियम सांभाळावे लागतील. या भेटीत ते एकमेकांना स्पर्श पण करू शकत नाहीत.

Updated : 22 Oct 2020 4:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top