Home > News > सायबर सुरक्षेवर प्रश्न, UGC चे ट्विटर अकाऊंट हॅक

सायबर सुरक्षेवर प्रश्न, UGC चे ट्विटर अकाऊंट हॅक

विद्यापीठ अनुदान आयोग या संस्थेच्या ट्वीटर अकाऊंटवर अज्ञात सायबर हल्लेखोराने हल्ला करत अकाउंटचा ताबा घेतला. त्यानंतर त्याने अनेक अनोळखी लोकांना टॅग केले. हल्लेखोराने ट्वीटरच्या प्रोफाइलचा फोटो बदलून व्यंगचित्राचा प्रोफाईल फोटो ठेवला.

सायबर सुरक्षेवर प्रश्न, UGC चे ट्विटर अकाऊंट हॅक
X

देशातील शिक्षण क्षेत्रातील महत्वाची संस्था असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे ट्वीटर हॅक झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. तर गेल्या तीन दिवसातील महत्वाच्या संस्थांचे ट्वीटर हॅक होण्याची ही तिसरी घटना आहे. (UGC twitter Account Hacked)

गेल्या तीन दिवसात देशातील तीन महत्वाच्या संस्थांच्ये ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सायबर सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गेल्या तीन दिवसात देशातील हवामानाचा अंदाज वर्तवणारी देशातील सर्वात महत्वाची संस्था असलेल्या भारतीय हवामान विभागाचे (IMD) ट्वीटर अकाऊंट हॅक झाले होते. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्वीटर (CMO UP) अकाउंटही हॅक झाले होते. त्यानंतर आता शिक्षण क्षेत्रातील महत्वाची संस्था असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे.

UGC india या अकाऊंटचे फॉलोवर्स :

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ट्वीटर अकाउंटचे 2 लाख 96 हजार इतके फॉलोवर्स (Followers of UGC twitter Account) आहेत. तसेच UGC चे ट्वीटर अकाउंट हॅक झाल्यानंतर या कृत्यामागे कोणाचा हात असू शकतो हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. तर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अकाउंटची रिकव्हरी सुरू आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रोफाईलला व्यंगचित्राचा फोटो

विद्यापीठ अनुदान आयोग या संस्थेच्या ट्वीटर अकाऊंटवर अज्ञात सायबर हल्लेखोराने हल्ला करत अकाउंटचा ताबा घेतला. त्यानंतर त्याने अनेक अनोळखी लोकांना टॅग केले. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले असल्याची बाब लक्षात आली. तसेच त्यानंतर हल्लेखोराने ट्वीटरच्या प्रोफाइलचा फोटो बदलून व्यंगचित्राचा प्रोफाईल फोटो ठेवला. तर बदललेला फोटोही अनेक जणांना टॅग केला होता. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने तातडीने या प्रकरणाची दखल घेत अकाउंटची रिकव्हरी सुरु केली आहे. (Hacker change twitter profile photo)

UGC च्या अकाउंटचे महत्व

UGC चे अकाउंट हे शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असलेल्या प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. या अकाउंटच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या विद्यापीठांची माहिती, अधिनियम, प्राध्यापक भरती, संशोधन यादी, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी याविषयी माहिती घेण्यात येते.मात्र रविवारी अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यावर व्यंगचित्राचे फोटो लावून अनेकांना टॅग करण्यात आले. त्यामुळे देशातील महत्वाच्या शैक्षणिक संस्थेचे अकाउंट हॅक झाल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असून हे हॅक कोणी केले असावे याचा शोध सुरू आहे.

Updated : 10 April 2022 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top