खासदार उदयनराजे यांची शैली काही खास आहे. ते नेहमी स्टाइल इज स्टाइल म्हणत माध्यमांसमोर येत असतात. आज त्याच खास शैलीत उदयनराजे यांनी त्यांच्या पत्नी दमयंती राजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उदयनराजे यांनी आपल्या ट्विटरवर दमयंती राजे यांचे सोबतचा एक फोटो ट्विट केला आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा मोठा वाटा असतो. राजकारण, समाजकारण तसेच माझ्या सुखदुःखात नेहमी मला साथ आणि सोबत देणाऱ्या माझ्या सहचारिणी राणीसाहेब आपणास वाढदिनी खूप खूप शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा. असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
Updated : 11 Jan 2021 4:00 AM GMT
Next Story