Home > News > वसईमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार, तरुणीला मारण्याचा कुटुंबियांचा प्रयत्न

वसईमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार, तरुणीला मारण्याचा कुटुंबियांचा प्रयत्न

वसईमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार, तरुणीला मारण्याचा कुटुंबियांचा प्रयत्न

वसईमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार, तरुणीला मारण्याचा कुटुंबियांचा प्रयत्न
X

पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये ऑनर किलिंगचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १८ वर्षीय तरुणीला तिच्याच कुटुंबियांनी मारुन टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून तिचे आई वडील आणि भावाने सुरुच्या बागेतील झुडपामध्ये ओढणीने तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तरुणी बेशुद्ध झाल्याने तिचा जीव बचावला आहे. स्थानिकांना हा प्रकार पाहिल्यावर पोलिसांना बोलावून जखमी तरुणीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. तरुणीच्या जबाबाववरून वसई पोलिसांनी तिचे आई-वडिल आणि भावाला अटक केली आहे.

Updated : 4 Nov 2020 7:00 AM GMT
Next Story
Share it
Top