Home > News > मुलांसोबत फोनवर बोलतात म्हणून दोन तरुणींना लाठ्याकाठ्यानी मारहाण

मुलांसोबत फोनवर बोलतात म्हणून दोन तरुणींना लाठ्याकाठ्यानी मारहाण

मुलांसोबत फोनवर बोलतात म्हणून दोन तरुणींना लाठ्याकाठ्यानी मारहाण
X

मुंबई: मध्यप्रदेश मधील अराजराजपुरातील युवतीला मारहाण झाल्याचं प्रकरण शांत होत नाही तो, अशीच अमानवी घटना समोर आली आहे. धार जिल्ह्यात शिल्लक कारणावरून दोन तरुणींना लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ धार जिल्ह्यातील टांडा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पीपलवा गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला मारहाण करणारे तिचे चुलत भाऊ आणि नातेवाईक आहेत. व्हिडिओ तरुणी जीव वाचवण्यासाठी ओरडत आहे, मदतीची भीख मागतायत,पण कठोर काळजाच्या लोकांना त्यांच्यावर थोडी सुद्धा दया आली नाही.

मारहाण झालेल्या तरुणींनी असा आरोप केला आहे की, त्या आपल्या मामाच्या कुटुंबातील दोन मुलांशी फोनवर बोलत असे. याचा राग आल्याने या दोघींना मारहाण करण्यात आली.

विशेष म्हणजे, मारहाण होताना त्याठिकाणी काही महिला सुद्धा उपस्थिती होत्या, पण त्यानाही या मुलींना वाचवावे असं वाटलं नाही.तर यातील काही महिलांनी सुद्धा या तरुणींना हातात असलेल्या लाठ्यांनी मारहाण केली.

Updated : 4 July 2021 6:50 AM GMT
Next Story
Share it
Top