Home > News > बलात्काराचे उदात्तीकरण करणाऱ्या त्या जाहिरातीवर बंदी..

बलात्काराचे उदात्तीकरण करणाऱ्या त्या जाहिरातीवर बंदी..

बलात्काराचे उदात्तीकरण करणाऱ्या त्या जाहिरातीवर बंदी..
X

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका परफ्यूम जाहिरातीवर निर्बंध घातले आहेत. ही जाहिरात बलात्काराला प्रोत्साहन देते आहे असा आक्षेप दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्यासह समाजमाध्यमांवर अनेकांनी घेत या जाहिरातीवर बंदी आणण्याची मागणी केली होती. या जाहिरातीवर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने निर्देश दिले आहेत.

बॉडी स्प्रे लेअर 'आर शॉट' कंपनीच्या आक्षेपार्ह जाहिरातीवर बंदी घालण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. यासोबतच ट्विटर, यूट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्मवरून ही जाहिराती हटवण्यास सांगण्यात आले आहे. कंपनीच्या दोन जाहिरातींवर लोक प्रचंड संतापले होते. लोकांनी सोशल मीडियावर अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) ला टॅग केले आणि जाहिरात बंद करण्याची मागणी केली होती. ही जाहिरात नियमांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

सोशल मीडियावर लोकांनी रोष व्यक्त केला होता..

याबाबत अनेक युजर्सनी सोशल मीडियावर ASCI ला टॅग करत अशा जाहिराती थांबवल्या पाहिजेत असे म्हटले होते. या संदर्भात ASCI ने सुद्धा ही जाहिरात निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद मानले आहेत. ही जाहिरात नियमांचे उल्लंघन आहे. यावर आम्ही तातडीने कारवाई केली आहे. कंपनीला जाहिरात काढून टाकण्यास सांगण्यात आले असून पुढील तपास सुरू आल्याच ASCI ने म्हंटल आहे.

काय आहे ही जाहीरात..

पहिल्या जाहिरातीत चार मुलं एका दुकानात बोलत आहेत. चार मुले परफ्यूमची शेवटची उरलेली बाटली पाहतात आणि आपापसात चर्चा करतात की आम्ही चार आहोत आणि एकच असेल तर "शॉट" कोण घेईल. मात्र या संवादादरम्यान जाहिरातीत बॉडी स्प्रेऐवजी मुलगी दाखवण्यात आली आहे. मुलगी मागे वळते, आणि चार मुलांवर रागावते, कारण तिला वाटते की ते त्याचबद्दल बोलत आहेत.

दुसरी जाहिरात बेडरूममधील जोडप्यापासून सुरू होते. अचानक मुलाचे चार मित्र खोलीत प्रवेश करतात आणि खूप अश्लील प्रश्न विचारतात की शॉट मारला असे वाटते. आता आमची पाळी आहे. मात्र ही जाहिरात पूर्ण पाहिल्यानंतर मित्रांनी खोलीत ठेवलेला शॉट परफ्यूम वापरता येईल का? अशी विचारणा केल्याचे कळते. मात्र लोकांनी ते पाहताच गोंधळ निर्माण होऊन वेगळाच अर्थ निघतो.

या जाहिराती पाहून सोशल मीडियावर लोक संतापले आहेत. अशा जाहिराती बलात्काराच्या संस्कृतीला खतपाणी घालत असल्याचे म्हणत अनवकांनी या जाहिराती बंद करण्याची मागणी केली होती.

स्वाती मालीवाल यांनीही या जाहिरातीला विरोध केला..

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या चित्रीकरणाच्या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला होता. स्वाती मालिवाला यांनी म्हंटल होतं की, "परफ्यूमच्या जाहिराती बनवताहेत की सामूहिक बलात्काराच्या मानसिकतेला चालना देत आहात? सर्जनशीलतेच्या नावाखाली तुम्ही कोणत्या स्तरावर प्रॉडक्ट विकत आहात? अशा जाहिराती टीव्हीवर चालवण्याआधी काही तपासून पाहिलं जातं नाही का? असं म्हणत त्यांनी पोलीस आणि आय अँड बी मंत्रालयाला पत्र या संदर्भात पत्र देखील लिहिलं होतं..

Updated : 4 Jun 2022 2:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top