Home > News > तौक्ते चक्रीवादळात अमृता फडणवीस आणि रुपाली चाकणकर यांचं 'राजकीय वादळ'

तौक्ते चक्रीवादळात अमृता फडणवीस आणि रुपाली चाकणकर यांचं 'राजकीय वादळ'

अम़ृता फडणवीसांच्या शायरीला रुपाली चाकणकरांचं शायरीतून उत्तर...

तौक्ते चक्रीवादळात अमृता फडणवीस आणि रुपाली चाकणकर यांचं राजकीय वादळ
X

रात्री उशिरा तौक्ते वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं. याचा मुंबईसह परिसराला चांगलाच फटका बसला. मात्र, तौक्ते वादळ गेलं असलं तरीही त्यावरून होणारे राजकीय वादळ काही थांबायला तयार नाहीत. तौक्ते वादळावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विटरवरून एकमेकांवर निशाणा साधला.


अमृता फडणवीस यांनी सोमवारी तौक्ते वादळावरून एक ट्वीट करत विरोधकांवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला होता.

ज्यात, " वादळ तर ह्या शहरात नेहमीच येतात, पुढे पाहू आता कुणाचा नंबर येतो",असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

अमृता फडणवीस यांच्या ट्विटला चाकणकर यांनी सुद्धा खास आपल्या शायरीतून उत्तर दिलं.

"वादळ ह्या शहराने नेहमीच पचवले,महाराष्ट्राने ह्या सोबत नेहेमीच खेळलं आहे,सोबतच भारतालाही सांभाळलं आहे"असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Updated : 2021-05-18T11:23:20+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top