Home > News > अमृता फडणवीस यांच्या ट्विट नंतर '३५ पुरणपोळ्या आणि पातेलभर तुप' पुन्हा ट्रेंडमध्ये!

अमृता फडणवीस यांच्या ट्विट नंतर '३५ पुरणपोळ्या आणि पातेलभर तुप' पुन्हा ट्रेंडमध्ये!

अमृता फडणवीस यांच्या ट्विट नंतर ३५ पुरणपोळ्या आणि पातेलभर तुप पुन्हा ट्रेंडमध्ये!
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुंबईत झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वजनावरून खिल्ली उडवली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही गोरेगावात झालेल्या सभेत टीकास्त्र सोडलं. या सर्व प्रकरणावर जर अमृता फडणवीस गप्प बसल्य़ा असत्या तरच नवल! त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं एक ट्विट केलंय.

त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटल आहे की, "वज़नदार ने हल्के को,बस हल्के से ही वज़न से, कल 'हल्का' कर दिया ... " त्यांच्या या ट्विट नंतर शिवसेना भाजप संघर्षात आणखीनच भर पडण्याची चिन्ह असताना नेटकऱ्यांनीही त्यांना आता बोल लावायला सुरूवात केली आहे.

यावर विवेक सदानंद या वापरकर्त्याने, "35 पुरणपोळ्या आणि पातेलभर तुप खायला नको देऊ आता", असं म्हणत अमृता फडणवीस यांना प्रतिक्रीया दिली आहे.

तर जे डी जोशी या वापरकर्त्याने एक व्यंग चित्रा मार्फत अमृता फडणवीस यांना प्रतिक्रीया दिली आहे. त्याने त्याच्या व्यंग चित्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना रूग्ण दाखवत त्यांच्या पोटावर महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांचे फोटो आहेत. उध्दव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे फोटो टाकले आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डॉक्टर दाखवलं असून ते फडणवीस यांना जाम पोटदुखी आहे, सकाळ – दुपार – संध्याकाळ टरबुज खात जा असा सल्ला देत आहेत.

आणखी एक वापरकर्ते माझा बारत सर्वाचा भारत याने अमृता फडणवीस यांना निवडणुक लढवण्याचा सल्लाच दिला आहे. मामी आपण राजकारणात का उतरत नाहीत. त्यानी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय,

"अहो

पुढच्या मुख्यमंत्रीपद तुम्हालाच मिळेल

महाराष्ट्रातील महीला मुख्यमंत्री

असे आडून आडून किती वार करणार

कोथरूड मधून नक्कीच आमदार व्हाल.

कोथरूड च"

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे..

शिवसंपर्क अभियानांतर्गत असलेल्या सभेला संबोधित करताना उध्दव ठाकरे म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पाडायला गेल्याचा दावा केला होता. पण ती काय शाळेची सहल होती का? तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, जर देवेंद्र फडणवीस यांनी पाय जरी ठेवला असता तरी बाबरीचा ढाचा कोसळला असता, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरून उध्दव ठाकरे यांनी टीका केली होती.

Updated : 16 May 2022 8:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top