Home > News > 'भक्तांनो तुम्हाला मुर्ख बनवुन ती परदेशात शिकतेय', असं म्हणत नेटकरी कुणावर भडकले?

'भक्तांनो तुम्हाला मुर्ख बनवुन ती परदेशात शिकतेय', असं म्हणत नेटकरी कुणावर भडकले?

भक्तांनो तुम्हाला मुर्ख बनवुन ती परदेशात शिकतेय, असं म्हणत नेटकरी कुणावर भडकले?
X

प्रसिध्द महिला पत्रकार रिचा अनिरूध्द थत्ते यांच्या कन्येने ब्रिटीश कोलंबिया विद्यापिठातून पदवी पुर्ण केली. त्या बद्दलचे ट्विट्स त्यांनी केले. पण नेटकऱ्यांनी उलट त्यांना आता याच गोष्टीवरून ट्रोल केलं आहे.

रिचा अनिरूध्द यांनी त्यांच्या मुलीचं अभिनंदन करताना म्हटलं आहे की, "काही प्रसंग असे असतात जेव्हा अभिमान, आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण असते, कदाचित छायाचित्रांमधून काही सांगता येईल..तुमच्या सर्वांच्या प्रार्थना सदैव सोबत राहोत...त्याबद्दल धन्यवाद!" त्या सोबत त्यांनी काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये त्यांच्या मुलीच्या हातात पदवी दिसतेय. एका फोटोमध्ये तर रिचा या सुध्दा त्यांच्या मुलीसोबत आनंद साजरा करताना दिसत आहेत.

पण त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत. रिचा यांचा आपल्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही म्हणून मुलीला परदेशात शिकण्यासाठी पाठवलं या अशा आशयाच्या प्रतिक्रीया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. Heyyou_NotYou या वापरकर्त्याने रिचा यांना एक सवाल विचारला आहे. ते म्हणतात, "ज्यांना आपण पाठिंबा देता त्यांना आपल्या देशातही अशी व्यवस्था करायला का नाही सांगत जेणेकचरून जे विद्यार्थी विदेशात नाही जाऊ शकत त्यांना देखील समान संधी मिळू शकेल"

तर भारतीय नागरीक या वापरकर्त्याने तर रिचा यांच्या मुलीला आयशाला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांना रिचा यांना सवालही विचारला आहे. "काय माझ्या देशात एकही असं विद्यापिठ नाही जिथे आपली मुलं शिक्षण घेऊ शकतात? सारे अधिकारी, व्यावसिक, राजकीय मंडळींची मुलं परदेशात जाऊनच का शिक्षण घेतात? आणि आपण देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करता."

तर MUR या वापरकर्त्याने सर्व भक्तांसाठी एक प्रतिक्रीया दिली आहे, "अंधभक्तांनो ही आपल्याला मुर्ख बनवून ब्रिटीश विद्यापिठातून पदवी घेत आहे."

शिक्षण कुणी कुठे घ्यावं हा ज्याचा त्याचा वेयक्तिक प्रश्न आहे. पण पत्रकार या नात्याने रिचा अनिरूध्द यांनी गेल्या काही वर्षात सरकारला ढासळत्या शिक्षण व्यवस्थेबद्दल कोणताही प्रश्न विचारलेला दिसुन येत नाही. आपण समानता म्हणत असलो तरी ही ती समानता नव्हे त्यामुळेच आपल्याला बरेच नेटकरी भडकल्याचे दिसुन आले. जर देशातील शिक्षण व्यवस्था सुधारली तर परदेशात जाणं शक्य नसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध होतील ही नेटकऱ्यांची आशा चुकीची तर वाटत नाही. पण त्यासाठी रिचा यांना ट्रोल करणे चुकीचे आहे.

Updated : 30 May 2022 6:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top