Home > News > भाजपच्या गवळणीनं दुसऱ्याला नाच्या म्हणणं शोभत नाय... अमोल मिटकरींच्या टीकेवर नेटकऱ्यांनी घेतली शाळा

भाजपच्या गवळणीनं दुसऱ्याला नाच्या म्हणणं शोभत नाय... अमोल मिटकरींच्या टीकेवर नेटकऱ्यांनी घेतली शाळा

भाजपच्या गवळणीनं दुसऱ्याला नाच्या म्हणणं शोभत नाय... अमोल मिटकरींच्या टीकेवर नेटकऱ्यांनी घेतली शाळा
X

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेतील इस्लामपूरच्या सभेत केलेल्या भाषणानंतर विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांच्या भाषणानंतर राजकारण चांगलंच तापलं होतं. ब्राम्हण महासंघापासून अनेक नेत्यांनी त्यांच्यावर अनेक टीका केल्या. याच दरम्यान सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरींना राष्ट्रवादीचा नाच्या म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना अमोल मिटकरींनी एक व्हिडीओ लायकीच दाखवली काकांनी तर... या कॅप्शन खाली अपलोड केला आहे.

त्यांच्या या ट्विट वर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत काहींनी तर अमोल मिटकरींनाच नाच्या म्हटलं आहे.

शिल्पा देशपांडे या वापरकर्तीने अमोल मिटकरींवर टीका करताना म्हटलंय की, तुझी लायकी तीच आहे @amolmitkari22 ज्यावेळी स्त्री चा अपमान सत्तेच्या लालसापायी केलास तेव्हा तू काय आहेस दाखवलास. जेव्हा जो व्यक्ती स्त्री सम्मान करत नाही तेव्हा तो त्याच्या घरातल्या स्त्री पासून सगळ्या स्त्रियांचा अपमान करत असतोतू तुझी पातळी सोडलीस तेव्हा तुला कोण आदर दादा देणार"

अनिल तांडेल या वापरकर्त्याने तर, "अरे तू नाच्याच नाही तर...... शरद पवार ह्यांची साफ करण्यासाठी बारामतीला बांधलेल टमरेल.... अरे त्या आदित्य अन उद्धव ठाकरेची मिमिक्री कर ना... चल तू वाकड्या तोंडाच्या शरद पवारची मिमिक्री कर....किरीट सौ मय्याच व्यंग काढतो हरामी....", अशा शब्दात टीका केली आहे.

कल्पेश कोठे यांनी तर अमोल मिटकरी यांना स्वतःच्याच पोस्टवरील कमेंट वाचण्याचा सल्ला दिला. ते म्हणालेत, "पहिले तुमच्या नेहमीच्या फेसबुक पोस्ट आणि ट्विट वर बरेचदा कंमेंट बघत जा, तुमची लायकी पण कळेल"

गणेश गायकवाड यांनी अमोल मिटकरांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिलाय., "साहेब जरा सांभाळुन बोला.आपल्या पगाराच्या बाहेर जातय हे.जादा पगार मिळनार नाही."

तर धनंजय या वापरकर्त्याने म्हटलंय की, "जनतेने लोकप्रतिनिधींना काम करण्यासाठी निवडलेले आहे. सत्ताधारी वा विरोधक यांनी एकमेकांवर वैयक्तिक टिका करायची आणि जनतेने फक्त ऐकत बसायचं. खरं तरं जनतेने आपल्याला बळ दिल आहे ते यासाठी नाही याच भान लोकप्रतिनिधींना असायला हवं.कायम बोलताना जनतेसाठीच आपण काय करत आहोत हे सांगणं महत्वाच"

योगेश बर्वे यांना म्हटलंय की, "किती रे तूझी हेटाळी ! नाच्या , नाच्या ? नाच्या ! योग्यता नसताना पाय चाटुन पद मिळाले की असे ऐकुन घ्यावे लागते",

अशा अनेक नेटकऱ्यांनी अमोल मिटकरींवर टीका केली आहे तर अनेकांनी त्यांची बाजू घेत सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे. एकंदरीत काय तर तर राजकारण्यांच्या या वाद प्रतिवादांमध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय हेच आपल्याला कळत नाहीये. जनतेची कामं करण्यासाठी निवडून दिलेल्य़ा लोकप्रतिनिधींना याची जाण राहिलीये की नाही हाच खरा प्रश्न आहे.

Updated : 27 April 2022 12:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top