Home > News > ट्विटरने लोगो पुन्हा बदलला... | twitter

ट्विटरने लोगो पुन्हा बदलला... | twitter

ट्विटरने लोगो पुन्हा बदलला... | twitter
X

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर हा जेव्हापासून इलोन मस्क यांनी खरेदी केला आहे तेव्हापासून तो वारंवार चर्चेत आहे. मुळात इलोन मस्क हे स्वतः देखील या ट्विटरच्या माध्यमातून वारंवार चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांमध्ये ते त्यांच्या ट्विट मुळे चर्चेत होते, त्यानंतर ट्विटर मध्ये त्यांनी अनेक मोठे बदल केले त्या बदलांमुळे ते चर्चेत आले, आता तर मागच्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी थेट ट्विटरचा लोगो बदलला आणि त्यांची चर्चा पुन्हा सुरू झाली. पण ही चर्चा दोन दिवसात थांबली कारण मस्क यांनी ट्विटरचा लोगो पुन्हा पहिल्यासारखा केला आहे..

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांनी ट्विटर या मायक्रो-ब्लॉगिंग साइटचा लोगो पुन्हा बदलला आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी लोगो म्हणून निळ्या पक्ष्याच्या जागी कुत्रा लावला. मात्र, हा बदल अॅपवर नसून केवळ वेब आवृत्तीवर करण्यात आला होता. आता पुन्हा निळा पक्षी हा पूर्वीचा लोगो परत आणण्यात आला आहे. हा लोगो वेब आणि अॅप दोन्हीवर आता सेम आहे. लोगोमध्ये बदल केल्यानंतर, क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइनमध्ये सुमारे 10% इतकी घट झाली होती..


ट्विटर लोगो DOGE काय होता?

सॉफ्टवेअर अभियंते बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी 2013 मध्ये बिटकॉइन सारख्या इतर क्रिप्टोकरन्सीची थट्टा करण्यासाठी डॉजकॉइन सुरू केले. मस्कने अनेक प्रसंगी त्याचे आवडते क्रिप्टोकरन्सी म्हणून वर्णन केले आहे. मस्कने फेब्रुवारी 2022 मध्ये डॉजकॉइनच्या समर्थनार्थ अनेक ट्विट केले. त्यावेळी त्यांनी पहिल्या ट्विटमध्ये फक्त 'DOGE' असे लिहिले होते.

दुसऱ्या ट्विटमध्ये मस्कने डॉजकॉइन हे लोकांचे क्रिप्टो आहे असं म्हंटल होतं यानंतर या क्रिप्टोकरन्सीची किंमत ५ सेंटवर गेली होती. मस्कच्या ट्विटपूर्वी ते तीन सेंट्सवर व्यवहार करत होते. डिसेंबर 2020 मध्ये देखील त्याने One Word: Doge ट्विट केले आणि त्याची किंमत 20% वाढली. आता ट्विटरच्या नवीन लोगोमध्ये मस्कने या क्रिप्टोकरन्सीच्या कुत्र्याचा फोटो वापरला आहे...

Updated : 8 April 2023 3:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top