Home > News > तुरीच्या दरात चढ उतार सुरु, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा

तुरीच्या दरात चढ उतार सुरु, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा

तुरीच्या दरात चढ उतार सुरु, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा
X

राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मागील ८ दिवसात जालना बाजारात तुरीची सर्वाधिक ६२ हजार ३७७ क्विंटल आवक झाली आहे. तर या ठिकाणी बाजारात सर्वाधिक ७ हजार ३५० रुपये दर मिळाला आहे. खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून नवीन तुर बाजार समितीत विक्रीला येत आहे. यामध्ये मागील ८ दिवसाच्या कालावधीत या बाजार समितीत ६२ हजार ३७७ क्विंटल तूर विक्रीस आली होती. या तुरीला५ हजारापासून ७ हजार ३५० रुपये प्रतीक्विंटल पर्यंतचे भाव मिळत आहे.

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यातून शेतकरी तुर विक्रीस आणीत आहे. तुरीबरोबरच सोयाबीन व अन्य शेतमाल शेतकरी येथे विक्रीस आणीत असल्याने बाजार समितीत तुर, सोयाबीन, गहू यासह अन्य शेतमालाचे प्रमाण अधिक आहे. बाजार समितीचा परिसर शेतकऱ्यांनी गजबजलेला दिसून येत आहे. मिळेल त्या वाहनाने शेतकरी तुरीसह अन्य शेतमाल विक्रीस घेऊन येत आहेत. या बाजार समितीमध्ये नवीन तुर साधरणतः डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विक्रीस येते. डिसेंबर ते मार्च अखेर पर्यंत तुरीची आवक कमी जास्त प्रमाणात असते. यंदा २०२३ साली नवीन तुर जानेवारीच्या पहिल्या आठवड्या पासून विक्रीस येत आहे.

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून तुरीची आवक ही ६ हजार क्विंटलवर वर पोहचली आहे. यामध्ये २३ जानेवारी रोजी तुरीची ९ हजार ३०४ क्विंटल सर्वोच्च इतकी आवक होती. जसजसी शेतकरी तुर तयार करतील आणि विक्रीस आणतील तसतशी आवक वाढत जाणार आहे. गतवर्षी तुरीचे उत्पादन चांगले झाले होते. बाजार समितीत आवक पण चांगली होती. परंतु यंदा या वेळेस तुरीचे पिक फुलावर आले त्यावेळेस धुके पडले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीवरील फुलोर गळून पडला होता. त्यानंतर डिसेंबर महिना अखेर व जानेवारी महिन्यात पडलेल्या धुक्याने पण तुरीचे नुकसान झाले. यामुळे यंदा तुरीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

Updated : 29 Jan 2023 8:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top