Home > News > तृप्ती देसाईंची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

तृप्ती देसाईंची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

तृप्ती देसाईंची बिग बॉसच्या घरात एन्ट्री
X

बिग बॉसचा यंदाचा तिसरा सीजन (Bigg Boss marathi Season 3 live) पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या सीजनमध्ये स्पर्धक कोण-कोण असणार याचीही उत्सुकता अनेकांना लागली होती. त्यामुळे कलर्स मराठीवर सुरू झालेल्या या कार्यक्रमात हळू हळू एक एक स्पर्धक समोर येत आहेत.

त्यातच आता बिग बॉसच्या घरात सामाजिक कार्यकर्ती आणि भूमाता ब्रिगेड संस्थेची संस्थापिका तृप्ती देसाई ( Tripti Desai ) पाहायला मिळणार आहे. शनी शिंगरणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी केलेलं आंदोलन असो किंवा महिलांच्या हक्कासाठी केलेली इतर आंदोलन असो, तृप्ती देसाई ह्या नेहमीच आपल्या आंदोलांमुळे चर्चेत असतात.

तृप्ती देसाई यांची बिग बॉसच्या घरात एंट्री झाल्याने खऱ्या अर्थाने बिग बॉसच्या घरात राडा पाहायला मिळणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तसेच अभिनेत्री सोनाली पाटील आणि अभिनेता विशाल निकल हे बिग बॉस 3 मराठीच्या घरातील पहिले दोन सदस्य असणार आहेत.

Updated : 20 Sep 2021 3:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top