Home > News > 'तो बोर्ड' हटवायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

'तो बोर्ड' हटवायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

तो बोर्ड हटवायला निघालेल्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात
X

शिर्डी येथील साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडाबाबत लावलेला फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आज (१० डिसेंबर) पुण्याहून शिर्डीकडे जाण्यासाठी रवाना झाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ रोखलं आणि ताब्यात घेतलं आहे. यावेळी देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही शिर्डीला जाण्यावर ठाम आहोत अशी भूमिका मांडली आहे.

कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. तृप्ती देसाई यांना सुपे पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. सुपा पोलिस स्टेशनचे प्रवेशद्वार पोलिसांनी केले बंद. माध्यमांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास रोखले आहे.

"अहमदनगरच्या सीमेवरच आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चर्चा करावी, अशा पद्धतीने आम्हाला रोखणं हे चुकीचं आहे, आम्ही आमच्या हक्क आणि अधिकारासाठी ही लढाई लढत आहोत, साई संस्थानला ताब्यात घेणं गरजेचं आहे, कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिर्डीला जाणारच." असा निर्धार तृप्ती देसाईं यांनी केला आहे.

Updated : 10 Dec 2020 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top