Home > News > "योगीजी, राम राज्य करण्याआधी सितेच्या रुपातील महिला सुरक्षित करा" तृप्ती देसाई

"योगीजी, राम राज्य करण्याआधी सितेच्या रुपातील महिला सुरक्षित करा" तृप्ती देसाई

योगीजी, राम राज्य करण्याआधी सितेच्या रुपातील महिला सुरक्षित करा तृप्ती देसाई
X

छेडछाडीविरोधात पोलिसात तक्रार दिल्यानं गुंडांनी गोळीबार करत पीडित मुलीच्या वडिलांची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यात घडली आहे.

यावर बोलताना भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाल्या की, "योगीजी आपल्या राज्यात नेमकं चाललंय काय? तुम्हाला तर उत्तर प्रदेश हे राम राज्य करायचं आहे. पण हे तर गुंडांचं राज्य होतय. तुम्हाला राम राज्य करायचं असेल तर आधी सितेच्या रुपात ज्या महिला आहेत त्यांना सुरक्षित करा." असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

Updated : 2021-03-03T13:26:52+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top