Home > News > 'लैंगिक अवयवाला स्पर्श करणे अनैसर्गिक लैंगिक कृत्य नाही' उच्च न्यायालयाचे निरीक्षण

'लैंगिक अवयवाला स्पर्श करणे अनैसर्गिक लैंगिक कृत्य नाही' उच्च न्यायालयाचे निरीक्षण

लैंगिक अवयवाला स्पर्श करणे अनैसर्गिक लैंगिक कृत्य नाही उच्च न्यायालयाचे निरीक्षण
X

ओठांचे चुंबन घेणे आणि लैंगिक अवयवाला स्पर्श करणे हा अनैसर्गिक लैंगिक कृत्याचा गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने नोंदवले आहे. हे निरीक्षण नोंदवत कोर्टाने १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन देखील मंजूर केला आहे.

या केसमध्ये मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. ही केस अशी होती की, मुलाच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार झाला असल्याची तक्रार केली होती. तर हा अल्पवयीन मुलगा ऑनलाइन गेम रिचार्जसाठी गेला असताना त्या ठिकाणी आरोपीने त्याच्या ओठांचे चुंबन घेतल्याचे आणि गुप्तांगाला स्पर्श केल्याचे त्याच्या पालकांना समजले त्यांनी या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या या तक्रारीनंतर आरोपीवर अनैसर्गिक लैंगिक संबंध व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता या केसच्या सुनावणी दरम्यान त्या मुलाने जो जबाब दिला होता त्यानुसार न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यांनी म्हंटल आहे की, आरोपीने त्याच्या ओठांचे चुंबन घेतले आणि त्याने त्याच्या गुप्तांगाला स्पर्श केला. सकृद्दर्शनी आरोपीचे हे कृत्य अनैसर्गिक लैंगिक गुन्हा होऊ शकत नाही.

Updated : 16 May 2022 3:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top