Home > News > #Tokyo2020 : भालाफेकीत भारताला पहिलं गोल्ड मेडल !

#Tokyo2020 : भालाफेकीत भारताला पहिलं गोल्ड मेडल !

#Tokyo2020 : भालाफेकीत भारताला पहिलं गोल्ड मेडल !
X

Tokyo Olympic 2020 मध्ये भारताला पहिले गोल्ड मेडल मिळवून देण्याच पराक्रम नीरज चोप्रा Neeraj Chopra याने केला आहे. नीरज चोप्राने भालाफेकीत इतिहास घडवत भारताला या ऑलिम्पिकमधील पहिले गोल्ड मेडल मिळवून दिले. या पदकासह टोकियो ऑलिम्पिकचा भारतासाठी गोड शेवट झाला आहे. टोकिया ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण ७ मेडल्सची कमाई केली आहे. भालाफेकीच्या अंतिम फेरीत एकूण १२ स्पर्धक होते. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरजने आघाडी घेतली आणि अखेर त्याने गोल्ड मेडलवर शिक्कामोर्तब केले.

भारताने आतापर्यंत टोकिया ऑलिम्पिकमध्ये ७ पदकांची कमाई केली आहे. अखेरच्या दिवशी बजरंग पुनिया याने कुस्तीमध्ये ब्राँन्झ पदकाची कमाई केली. तर नीरज चौप्रा याने भालाफेकीत इतिहास घडवत पहिलं गोल्ड मेडल जिंकले आहे. सेमी फायनमध्ये पराभूत झाल्यानंतर शेवटच्या संधीचे सोने करत कुस्तीपट्टू बजरंग पुनिया याने ब्रॉन्झ मेडल मिळवले. या पदकांसह भारताने एकूण सात पदकांची कमाई केली अहे. यामध्ये दोन सिल्व्हर चार ब्रॉन्झ मेडल मिळाले आहेत. मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगमध्ये तर कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. तर पी व्ही सिंधूला बॅडमिंटन , लवलीना बोरगोहेन बॉक्सिंगमध्ये, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि हॉकी पुरुष संघ अशा चौघांनी ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे.

Updated : 7 Aug 2021 12:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top