Home > News > दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात यंदा 5 महिलांकडून अथर्वशीर्ष पठण

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात यंदा 5 महिलांकडून अथर्वशीर्ष पठण

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात यंदा 5 महिलांकडून अथर्वशीर्ष पठण
X

दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पहाटेच्या सुमारास हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारं सामूहिक अथर्वशीर्ष पठण यंदा केवळ पाच महिलांच्या उपस्थितीत ‘बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात पार पडलं. तर, हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला. इथल्या या उपक्रमाला ३४ वर्षांची परंपरा आहे. ती खंडीत झाली नसली तरी मर्यादित स्वरुपात पार पडली.

दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्यावतीने रविवारी पहाटे १२८ व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अथर्वशीर्ष पठणाची सुरुवात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शंख वादनाने झाली. गणपतीच्या आगमनाच्या दुसर्‍या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपासमोर होणाऱ्या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाची शहरातील महिला वर्ग वाट पाहत असतात. मात्र, यंदा करोनामुळे हा उत्सव नेहमीप्रमाणे भव्यदिव्य स्वरूपात करता न आल्याने सर्वांची निराशा झाली. मात्र, तरी देखील अनेक महिलांनी मंदिराच्या बाहेरून ऑनलाइन स्वरुपात दर्शनाचा लाभ घेतला.

Updated : 23 Aug 2020 6:19 AM GMT
Next Story
Share it
Top