Home > News > ही तर शेतकऱ्यांसह पत्रकारांची गळचेपी; प्रियंका गांधी मोदी सरकारवर बरसल्या

ही तर शेतकऱ्यांसह पत्रकारांची गळचेपी; प्रियंका गांधी मोदी सरकारवर बरसल्या

ही तर शेतकऱ्यांसह पत्रकारांची गळचेपी; प्रियंका गांधी मोदी सरकारवर बरसल्या
X

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांचा आणि पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर मोदी सरकारने अनेक शेतकऱ्यांवर जीवघेण्याचा प्रयत्न केल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

शेतकऱ्यांबरोबरच उत्तर प्रदेशात गौतमनगर येथे घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यासह आणखी ६ पत्रकारांविरोधात उत्तर प्रदेश पोलीसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, मृणाल पांडेय, जफर आगा, परेशनाथ, अनंत नाथ व विनोद जोस यांचा समावेश आहे. मोदी सरकारकडून शेतकरी आंदोलन चिरडण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असल्याचंही या पत्रकरांचं मत आहे.

याच प्रकरणी भाष्य करत प्रियांका गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "शेतकरी आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांवर आता देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. अनेक ठिकाणचे इंटरनेट बंद करण्यात येत आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते विसरतात की शेतकऱ्यांचा आवाज जेवढ्या प्रमाणात दाबला जाईल त्यापेक्षा जास्त प्रमाणात सरकारच्या अत्याचाराविरोधातील आवाज वाढत जाईल."

Updated : 2021-01-31T18:50:20+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top