Home > News > 'राऊतांची अमिषा पटेलला मिठी..' ट्रोलर्सना वाईट वाटण्याचं कारण काय?

'राऊतांची अमिषा पटेलला मिठी..' ट्रोलर्सना वाईट वाटण्याचं कारण काय?

राऊतांची अमिषा पटेलला मिठी.. ट्रोलर्सना वाईट वाटण्याचं कारण काय?
X

संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व नेहमी चर्चेत असणारे नाव आहे. दररोज काही न काही कारणाने संजय राऊत माध्यमांमध्ये तर चर्चेत असतातच पण त्याहून अधिक ते समाजमाध्यमांवर चर्चेत असतात. मग त्या ठिकाणी कधी त्यांचं कौतुक होत असतं तर कधी त्यांच्यावर जोरदार घणाघात होत असतो. आता समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याचा नवीन एक प्रकार आहे तो म्हणजे मिम्स. संजय राऊत पण या मिम्सच्या तावडीतून सुटले नाहीयेत. त्यांच्यावर सुद्धा दररोज अनेक मिम्स बनत असतात. आता सुद्धा ते समाजमाध्यमांवर चर्चेत आहेत. आता ते का चर्चेत आहेत पाहुयात..

संजय राऊत यांनी अमिषा पटेल यांना असं काय केलं त्यामुळे ते साध्य ट्रोल होत आहेत.

तर नुकताच 'धर्मवीर' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सुद्धा गेली होती तिच्यासोबत या कार्यक्रमाला सलमान खान, रितेश देशमुख, अमिषा पटेल यांच्यासोबतच शिवसेनेचे अनेक प्रमुख नेतेही उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांनीही उपस्थिती लावली होती.

या कार्यक्रमात संजय राऊत आणि अमिषा पटेल यांच्या भेटीची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे. स्वतः अमिषाने या ट्रेलर लाँच कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती व्यासपीठावर जाताना तिला संजय राऊत दिसतात. यानंतर ती त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना हस्तांदोलन करत आलिंगन देते. यानंतर राऊतही तिच्याशी गप्पा मारताना दिसत आहेत. काही क्षण त्यांच्याशी बोलून ती पुढे निघते.

आता समाजमाध्यमांवर याच व्हिडिओचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या या भेटीवर आता अनेक मिम्स देखील बनले आहेत.

Updated : 10 May 2022 9:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top